tv9 Marathi Special Report | अचलपूर नगरपरिषदेत भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि MIM एकत्र आल्याने, प्रत्येक भाषणात हिंदुत्वावर घसा कोरडा होईपर्यंत बोलणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहे.
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि MIM एकत्र आल्याने, प्रत्येक भाषणात हिंदुत्वावर घसा कोरडा होईपर्यंत बोलणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहे. कारण अचलपूर नगरपालिकेत समितीच्या निवडीवेळी भाजप आणि MIM ची युती झाली. भाजप MIM आणि अजित पवारांच्याबी राष्ट्रवादीने एकमेकांना साथ देऊन सर्वांचाच फायदा करून घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची भूमिका काय असणार, तसेच नवनीत राणा आणि अनिल बोंडे यांच्याकडून यावर काय स्पष्टीकरण दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या युतीमुळे आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे.
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास

