अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026
अमरावती महानगर पालिका ही राज्यातील जुन्या महानगरपालिकांपैकी एक महानगरपालिका आहे. 2023 मध्ये या महापालिकेची मुदत संपली होती, तेव्हापासून या महानगरपालिकेसाठी निवडणूकच झाली नाही, दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून अमरावती महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या या महापालिकेमध्ये 45 जागा निवडून आल्या होत्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमाकांवर होतं या महापालिकेत काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले होते.
Amravati Mayor: अमरावतीत भाजपच धुरंधर; AIMIM च्या पाठिंब्याने फुलले ‘कमळ’, ताज्या घाडमोडीत या नगरसेवकाचा राजकीय बळी?
BJP-AIMIM in Amravati Mayor: अमरावती महापालिकेत मित्र पक्ष आणि विरोधकांवर भाजप भारी ठरला. भाजपने एकाच फटक्यात सर्वांचे हिशेब चुकते केल्याचं मानलं जातं. AIMIM च्या पाठिंब्याने इथं 'कमळ' फुलले. पण त्याचा फटका पाठिंबा देणार्या उमेदवाराला बसला आहे. आता त्याच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे.
- Reporter Swapnil Umap
- Updated on: Feb 7, 2026
- 9:20 am
Amaravati | महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा, अमरावतीत कट्टर विरोधक एकत्र
अमरावतीच्या राजकारणात मोठा आणि महत्त्वाचा टर्न पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि MIM युतीबद्दल चर्चा सुरू होती, अमरावती महापालिकेच्या महापौरपदासाठी MIM ने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महापौरपदासाठी भाजपला मोठा बळ मिळाले आहे आणि अमरावतीत महापौर खुर्चीवर भाजपचे उमेदवार विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Feb 6, 2026
- 2:59 pm
tv9 Marathi Special Report | अचलपूर नगरपरिषदेत भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि MIM एकत्र आल्याने, प्रत्येक भाषणात हिंदुत्वावर घसा कोरडा होईपर्यंत बोलणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 23, 2026
- 11:45 am
नवनीत राणांवर मोठं संकट, पराभूत 22 उमेदवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; त्या मागणीने खळबळ
Navneet Rana : अमरावतीत भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पराभवाचे खापर नवनीत राणा यांच्यावर फोडले आहे. तसेच नवनीत राणा यांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 17, 2026
- 6:45 pm
Yashomati Thakur | अमरावतीत भाजप कुबड्या… काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीत भाजपचं संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घसरलं आहे. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे फक्त 25 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत, मात्र काँग्रेसने आपलं संख्याबळ कायम ठेवलं आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने जोरदार मुसंडी मारत 15 जागांवर विजय मिळवला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Jan 17, 2026
- 1:53 pm
अकोला : उमेदवारांनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या
अकोला शहरातल्या मोठी उमरी परिसरातल्या प्रभाग क्रमांक 4 मधील ताथोड नगर मध्ये उमेदवारांकडून साडी वाटप करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास घरासमोर साड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता स्थानिक महिलांनी या साड्या जाळल्या आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 13, 2026
- 11:30 pm
आता नो राणा नो पाणा.. फक्त कमळ, कपाट अन्..; भाजपच्या मंत्र्यांचं वक्तव्य चर्चेत
"युती तुटली, त्यामुळे आता नो राणा नो पाणा... फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा," असं वक्तव्य भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांनी अमरावती महानगरपालिकेच्या प्रचार सभेत केलं. भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटल्याने अपक्ष उमेदवारांना भाजपने पाठिंबा दिला आहे. भाजपसोबतच अपक्ष उमेदवारांना निवडून आणण्याचा मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून प्रचार केला जात आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 12, 2026
- 1:45 pm
‘असदुद्दीन ओवैसी चेकाळलाय’, हिजाबच्या स्टेटमेंटनंतर भाजप खासदाराचं वक्तव्य
"लक्षात ठेवा मुस्लिमांबद्दल तुम्ही हा जो द्वेष पसरवताय, तो जास्त काळ टिकणार नाही. द्वेष पसरवणारे संपून जातील. आज तुम्ही बघा, सोलापूरमध्ये 104 रुपयात एक लिटर पेट्रोल मिळतं"
- Reporter Swapnil Umap
- Updated on: Jan 10, 2026
- 1:46 pm
एक खासदार निवडून नाही आली तर… नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांची भरसभेत जुंपली, अमरावतीत मोठी खळबळ
Anil Bonde-Navneet Rana: अमरावती महानगरपालिकेत मित्रपक्षातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. रवी राणा-नवनीत राणा विरुद्ध भाजप असा सामना इथं रंगला आहे. युवा स्वाभिमानी पक्ष आणि भाजपमध्ये महापालिकेत काही ठिकाणी युती तर काही प्रभागात सामना पाहायला मिळत आहे. त्यातून दोघांमध्ये सामना रंगला आहे.
- Reporter Swapnil Umap
- Updated on: Jan 8, 2026
- 2:47 pm
अमरावती : भाजपचा गढ असलेल्या प्रभागात नवनीत राणा यांचा प्रचार
अमरावतीच्या साईनगर प्रभागानंतर आता भाजपचा गढ असलेल्या मोरबाग प्रभागातही नवनीत राणा यांच्याकडून रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. युवा स्वाभिमानचे उमेदवार दिपक सम्राट यांच्यासाठी हा प्रचार केला जात आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 7, 2026
- 11:14 pm
Bacchu Kadu: माझ्या पती विरोधात लढाल तर…नवनीत राणांच्या त्या भूमिकेचं बच्चू कडू यांच्याकडून तोंडभरून कौतुक, अमरावतीत दोन कट्टरविरोधक एकत्र?
Bacchu Kadu on Navneet Rana And Ravi Rana: अमरावती महापालिका निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. बच्चू कडू यांनी कट्टर विरोधक नवनीत राणा आणि रवी राणा यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे समोर आले तर दोघांचा शाल देऊन सत्कार करण्याचा मनोदय पण व्यक्त केला आहे. अमरावतीच्या आखाड्यात काय घडतंय?
- Reporter Swapnil Umap
- Updated on: Jan 6, 2026
- 9:39 am
Shivsena-BJP: सत्तेत मित्र, महापालिकेत शत्रू; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीच नाही तर या 12 ठिकाणी महायुतीत बिनसलं, राजकारणातील नवीन समीकरणं काय?
Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 12:02 pm