एक खासदार निवडून नाही आली तर… नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांची भरसभेत जुंपली, अमरावतीत मोठी खळबळ
Anil Bonde-Navneet Rana: अमरावती महानगरपालिकेत मित्रपक्षातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. रवी राणा-नवनीत राणा विरुद्ध भाजप असा सामना इथं रंगला आहे. युवा स्वाभिमानी पक्ष आणि भाजपमध्ये महापालिकेत काही ठिकाणी युती तर काही प्रभागात सामना पाहायला मिळत आहे. त्यातून दोघांमध्ये सामना रंगला आहे.

Anil Bonde-Navneet Rana: अमरावतीत सध्या मित्रांमध्ये जुंपली आहे. काही प्रभागात नवनीत राणा या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या तर काही प्रभागात चक्क भाजपच्या उमेदवारा विरोधात पती-पत्नीने प्रचाराचा धुराळा उडवल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यावरून खासदार अनिल बोंडे यांनी कानपिचक्या दिल्यानंतर आता नवनीत राणा भडकल्या आहेत. भर प्रचार सभेत या दुखण्याचे प्रदर्शन मतदारांनाच नाही तर कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध सर्व इतरमध्ये भाजपमधील एक गट सक्रिय असल्याचे दिसून आले. अमरावतीत या धुमश्चक्रीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार बोंडे-नवनीत राणांमध्ये जुंपली
अमरावतीत भाजपच्या प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच भाजप खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्यात जुंपली. खासदार बोंडे म्हणाले की, पंजा मोठा घातक आहे पंजा दाखवू नका गळा आवळते. त्यांच्याविरोधात मूठ बांधा. अमरावती महानगपालिकेमध्ये हिंदू महापौर बनवायचा आहे. नवनीत भाभी जसं म्हणतात तसं कमळ दाखवा.भारतीय पार्टी अजिंक्य आहे.अमरावती मधील काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि एमआयम यांनी लाजाशर्मा सोडल्या आहेत. ओवैसी म्हणतात की महापौर मुस्लिम होईल .काँग्रेसने जाहीर केलं शपथ घेतली आहे. तुमच्यासाठी फक्त भाजप आहे.
त्याचवेळी खासदार बोंडे यांनी आपला मोर्चा नवनीत राणा यांच्याकडे वळवला. कोण काय बोलत यांच्याकडे विचार करू नका. मत मागाल तर फक्त भाजपच्या कमळसाठी मागा. माझ्या स्वभावात कुणावर टीका करण्याची सवय नाही. एकदा भगवा घातला तर जुनं विसरून जा. माझा सखा भाऊ जरी YSP युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी,किंवा काँग्रेस,शिवसेना वर जरी उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील, असा चिमटा बोंडेंनी राणा यांना काढला.योगीजींनी सांगितले की बटंगे तो कटंगे याची आठवणही बोंडे यांनी करून दिली.
मग नवनीत राणांनी काढले उट्टे
खासदार बोंडे यांनी शालीतून जोडे हाणल्यानंतर मग नवनीत राणा यांनी त्यांना भरसभेतच सुनावलं. बोंडे भाऊ मीही मोर्शी फिरून आली आहे. मोर्शीमध्ये माझी सभा झाली आहे.कोणालाही बोलण्याची गरज नाही. जो भगव्या सोबत भाजप सोबत बेईमानी करेल त्यांच्या सोबत नवनीत राणा कधीच उभी राहणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. काही लोकांनी म्हटलं होतं लोकसभेत एक अमरावतीची खासदार निवडणूक आली नाही तर काय फरक पडतो. एक अमरावती हारलो तर काही फरक पडत नाही, असं लोक म्हणायचे, असा जुन्या जखमेवरची खपली राणा यांनी स्वतःच काढली आणि खासदार बोंडे यांना जबरी टोला लगावला. लोकसभेत काही लोकांनी कमळाविरोधात काम केल्याचं सांगत त्यांनी बोंडेंवर निशाणा साधला. भगव्यासोबत बेइमानी करणाऱ्याला सोडणार नाही, बेईमानांना भीती राहणारच आहे असे त्यांनी सुनावले. हा प्रकार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच झाला.
