AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक

कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 01, 2026 | 12:37 PM
Share

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे कांद्याच्या बाजारभावातील घसरणीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याला प्रति क्विंटल ₹2500 उत्पादन खर्च येत असताना, केवळ ₹7-8 प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. शासनाने प्रति क्विंटल ₹1500 अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील लासलगाव उपबाजार आवारात कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा मोठ्या तोट्यात विकावा लागत असल्याने, नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदे ओतले.

शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उन्हाळ कांद्याचे उत्पादन खर्चही वसूल झाला नसल्याचे सांगितले. यावर्षीचा लाल कांदा केवळ ₹7-8 प्रति किलो दराने विकला जात आहे, तर त्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल ₹2500 येतो. यामुळे शासनाने तातडीने प्रति क्विंटल ₹1500 अनुदान देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास, लोकप्रतिनिधींना नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Published on: Mar 01, 2026 12:37 PM

Follow Us
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..