AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

दिल्लीतील आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुलींना पोलीस कशा पद्धतीने मारहाण करत आहेत, त्याचे व्हिडीओ दाखवले. बंदुकीने फायर करण्यात आल्याचंही दाखवलं. एका तरुणाच्या अंगावर बंदुकीचे छर्रे लागल्याचं दिसत आहे. त्यांची चूक काय होती असा प्रश्न गांधींनी उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं
Rahul Gandhi on Lathi ChargeImage Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 4:44 PM
Share

दिल्लीतील आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुलींना पोलीस कशा पद्धतीने मारहाण करत आहेत, त्याचे व्हिडीओ दाखवले. बंदुकीने फायर करण्यात आल्याचंही दाखवलं. एका तरुणाच्या अंगावर बंदुकीचे छर्रे लागल्याचं दिसत आहे. त्यांची चूक काय होती असा प्रश्न गांधींनी उपस्थित केला आहे.

मुलींची चूक काय?

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, ‘प्रश्न असा आहे की हे असं का घडलं. हजारो विद्यार्थी होते. सेक्युरीटीने त्यांना मारलं. त्या मुलांनी असं काय चुकीचं केलं होतं. ते शांततेत आंदोलन करत होते. ते मागण्या मागत होते. त्यांनी काही गुन्हा केला नव्हता. पण फक्त देशातील विद्यार्थ्यांचं ऐका असं त्यांचं म्हणणं. आम्हाला शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. आम्हाला काही नको असं त्यांना म्हणायचं होतं. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक विद्यार्थी तणावात होते. सर्वांनी यावर विचार केला पाहिजे. आपली शिक्षण व्यवस्था ही जगातील बेस्ट शिक्षण व्यवस्था मानली जाते. पण आज ती अवस्था राहिली नाही.’

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे…

राहुल गांधी यांनी पेपरफुटीवर बोलताना म्हटले की, ‘पेपर फुटणे ही मोठी समस्या आहे. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ते नैराश्यात गेले. शिक्षण व्यवस्था सुधारण्याची ते मागणी करत होते. 152 पेपर गेल्या दशकभरात फुटले आहेत. 5 कोटी विद्यार्थ्यी आणि त्यांच्या कुटुंबाला झळ सोसावी लागली. नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. गेल्या दहा वर्षात एकालाही शिक्षा झाली नाही. कोणीतरी आपली शिक्षण व्यवस्था पोखरत आहे. उद्ध्वस्त करत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. आपले तरुण आंदोलन का करत आहेत? याचा विचार केला पाहिजे.’

विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे…

राहुल गांधी यांनी सांगितले की, नीट परीक्षेवर होणारा खर्च एकूण शिक्षणाच्या तोडीचा आहे. 1.32 कोटी रुपये विद्यार्थी नीट वर खर्च करतात. 1.3 लाख रुपये हा शैक्षणिक बजेट आहे. तरीही पेपर लीक होत आहेत. विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...