AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

| Edited By: | Updated on: Jul 22, 2026 | 3:49 PM
Share

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत. वारीतील अंतिम मुक्काम असलेल्या वाखरी येथे लाखो वारकरी एकत्र येणार असून, प्रशासनाकडून स्वागत आणि नियोजनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत. वारीतील अंतिम मुक्काम असलेल्या वाखरी येथे लाखो वारकरी एकत्र येणार असून, प्रशासनाकडून स्वागत आणि नियोजनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी हे आषाढी वारीतील शेवटचे विसाव्याचे ठिकाण मानले जाते. याच ठिकाणी विविध संतांच्या मानाच्या पालख्या एकत्र येतात. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी वाखरीत दाखल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाखरी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने पाणी उपसून रस्त्यांचे सपाटीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वाखरी येथे लाखो वारकरी मुक्काम करणार असल्याने सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीपूर्वी वाखरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विठ्ठलनामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Published on: Jul 22, 2026 03:49 PM

Follow Us
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी