AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी सरकारकडे तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!
rahul gandhi and narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 5:26 PM
Share

Rahul Gandhi Press Conference : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका सीजेपीची आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे.  21 जुलै रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला घेरलं आहे. नीट पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हे मुद्दे उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या तीन मागण्या आहेत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

मला माझी  पर्वा नाही, परंतु विद्यार्थ्यांना…

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? याबाबत भाष्य केलं. विद्यार्थ्यांसोबत अमानुषपणे  वागणूक देण्यात आली आहे. माझ्यासोबत जो व्यवहार झाला, त्याची मला पर्वा नाही. आणखी पाच वेळा जरी माझ्यासोबत असाच व्यवहार झाला तरी मला त्याचे काहीही वाटणार नाही. परंतु विद्यार्थ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे म्हणत आमचा लढा चालूच राहील, असे संकेत त्यांनी दिले.

राहुल गांधी यांनी काय मागण्या केल्या?

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या वतीने एकूण तीन मागण्या केल्या आहेत. यात सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची, विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी दुसरी मागणीदेखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, अत्याचार झाला हे मान्य करून मोदींनी मोठ्या मनाने माफी मागावी, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच ज्यांनी विद्यार्थ्यांसोबत मारहाण केलेली आहे, त्यांना या प्रकरणात जबाबदार धरले पाहिजे, अशी तिसरी मागणी राहुल गांधींनी केली. दरम्यान, आता या मागण्यांवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी