AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी

विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी

| Updated on: Sep 03, 2026 | 7:29 PM
Share

डीजेमुक्त गणेशोत्सवाचा आग्रह धरणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्यानंतर त्यांच्या रत्नागिरीतील आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट यांनी आपल्या मुलाच्या डीजेमुक्त भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच, त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत, विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी आग्रही असलेले विद्यानंद बापट यांना नुकतीच पुण्यात मारहाण झाली. या घटनेनंतर त्यांच्या मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप येथील आई-वडिलांनी त्यांची भूमिका आणि हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट यांनी आपल्या मुलाच्या डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

सुहास बापट यांनी विद्यानंदच्या मागणीला योग्य ठरवत मारहाणीचा निषेध केला. डीजेमुळे सार्वजनिक जीवनात होणारा त्रास टाळण्यासाठी ही भूमिका आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना बापट यांनीही मारहाणीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, “अशी मारहाण नाही करायची. तो बोलतोय ना मग तुम्ही पण बोलायचं” अशी प्रतिक्रिया दिली. डीजेच्या आवाजामुळे त्यांच्या घरातील भांडी हलायची, हा अनुभव त्यांनी कथन केला. दोघांनीही विद्यानंदला पोलीस संरक्षण मिळायला हवे अशी मागणी केली आहे. टीव्ही नाईनच्या कॅमेरामॅनने मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. बापट कुटुंबीय विद्यानंदच्या भूमिकेमागे खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Sep 03, 2026 07:29 PM

Follow Us