AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले…

| Updated on: Oct 20, 2026 | 2:08 PM
Share

मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात उपस्थित समर्थकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. ऊन सहन करून शांत बसण्याची आणि मराठा समाजाच्या संघर्षाचे गांभीर्य समजून घेण्याची त्यांनी विनंती केली. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्यात एकजूट महत्त्वाची असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यातील समर्थकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. भर उन्हात भरलेल्या या मेळाव्यात अनेकजण उभे राहिल्याने गोंधळ निर्माण झाला होता. जरांगे यांनी समर्थकांना खाली बसण्याची आणि शांत राहण्याची विनंती केली. “आपण कशासाठी जमलो आहोत, याचा विचार करा. ऊन, वारा, पाऊस अंगावरती कशासाठी घेतोय, हे समजून घ्या,” असे ते म्हणाले. जरांगे यांनी कार्यकर्त्यांना कठोर शब्दात शिस्त पाळायला लावली.

समोरच्यांना दिसण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी त्यांनी वारंवार सूचना दिल्या. “तीन वर्षांपासून मराठा समाज संघर्ष करत आहे. समाजाचे आणि लेकराबाळांचे भविष्य महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी एकजूट आणि शिस्त आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. माध्यमांनाही त्यांनी अनावश्यक गोष्टी दाखवू नयेत, अशा सूचना दिल्या. हा संघर्ष सोपा नाही, त्यामुळे सर्वांनी गंभीरपणे परिस्थिती हाताळावी, असा संदेश जरांगे यांनी दिला.

Published on: Oct 20, 2026 02:07 PM

Follow Us