AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

२५ पानी प्रतिज्ञापत्र दाखल करत मलिकने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. खटला लढण्यास नकार देत त्याने स्वतःसाठी फाशीची मागणी केली. मात्र, ही मागणी गुन्ह्याची कबुली नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. नेमका काय आहे मलिकचा दावा?

Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
Yasin Malik, Sarla Bhat murder caseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 10:12 PM
Share

Sarla Bhat Murder Case : आपण कश्मीरी पंडित सरला भट हत्याकांड प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचे मोहम्मद यासीन मलिकने कोर्टात सांगितलं आहे. बंदी घातलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्याने दावा केला की, आपल्याला अडकवण्यासाठीच हे सर्व प्रकरण तयार करण्यात आले आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे सर्व निष्पक्ष पोलिस तपासाऐवजी बनावट प्रकरणासाठी हवे असतात तसे असल्याचे म्हटले आहे. तथापी, मलिक यांनी न्यायालयात खटला लढवण्यास नकार दिला असून आपल्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, ६० वर्षांचा यासीन मलिक बऱ्याच दिवसांपासून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. १९ एप्रिल १९९० रोजी झालेल्या काश्मिरी पंडित सरला पंडित यांच्या हत्येत सहभागाचा आरोप यासीनवर करण्यात आलेला आहे. श्रीनगर राज्य तपास यंत्रणेने २९ जून रोजी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये मलिकचं नाव मुख्य आरोपी म्हणून प्रविष्ट केलं आहे. यालाच प्रतित्यूर म्हणून मलिक यांच्यावतीने न्यायालयात २५ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. तिहार मध्यवर्ती कारागृह क्रमांक 7 मध्ये सत्यापित केलेल्या या पत्रामध्ये खटला न लढवण्याचा घेतलेला हा निर्णय सद्सदविवेकबुद्धीतून घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. माझ्या वैयक्तिक परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करुन मी खटला न चालवण्याचा निर्णय घेत आहे. माझ्या निर्णयाचा अर्थ कोणत्याही माझ्यावर लावलेल्या आरोपांमधील गुन्ह्यांची कबुली असा घेऊ नये, मी मृत्यूदंडाची मागणी करतो, असं म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या प्रतिज्ञापत्रात मलिकने आपल्यावरील आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे नाकारले असून घटनेच्या तीन दशकांनंतर केले गेलेले सर्व आरोप हे एक षडयंत्र आणि मनाला वाटेल तसं रचलेलं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. त्याने असा दावा केला की, “एप्रिल १९९०मध्ये नरवारामध्ये बीएसएफच्या छाप्यादरम्यान इमारतीवरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यात तो कोमात गेला होता. तत्कालीन सरकारी दूरदर्शन आणि अनेक वृत्तसंस्थांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली होती. जो व्यक्ती बेशुद्ध होता, मृत्यूशी झुंज देत होता. तो या गुन्ह्यात कसा सामील होऊ शकतो? तो कोणत्याही गुन्हेगारांना कशा काय सूचना देऊ शकतो किंवा मग तो स्वतः गुन्हा करु शकतो.”

मलिकने प्रतिज्ञापत्रात सरला भट यांचाही उल्लेख केला आहे. “सरला भट या माझ्या १३ वर्षांच्या लेकी रझिया सुलताना यांच्याइतकाच निष्पाप होत्या.” तसेच सरला सुरक्षा यंत्रणांसाठी माहिती देणारी म्हणून काम करत असल्याचा दावा मलिक यांनी फेटाळला आहे. सरला कोणत्याही गुप्त एजन्सीसाठी काम करत नव्हत्या किंवा त्यांनी मी कुठे लपलेलो आहे ही माहितीही दिली नव्हती.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी