AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू

मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी गेल्या २९ ऑगस्ट पासून सुरु केलेले उपोषण आंदोलन अजूनही मागे घेतलेले नाही. सरकारी शिष्ठमंडळाने गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतू जरांगे यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला अल्टीमेटम दिले.

11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
manoj jarange patil
| Updated on: Sep 03, 2026 | 11:41 PM
Share

मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट पासून सुरु केलेले उपोषण आंदोलन आज सरकारचे मंत्री उपोषण स्थळी आल्यानंतरही मागे घेतलेले नाही. तुम्हाला मराठ्यासाठी ११ तारखेपर्यत जे काम करायचे ते करा, ११ तारखेपर्यंत आंदोलन काही थांबणार नाही. सरकार १० तारखेची वाट पहायला लावणार नाहीत अशी मला खात्री आहे. काम झाले तर गुलाल टाकायला मुंबईत जाऊ आणि शिरसाठ आणि बावनकुळेंवर जास्त गुलाल टाकू असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम देत सांगितले आहे.

मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी गेल्या २९ ऑगस्ट पासून सुरु केलेले उपोषण आंदोलन अजूनही मागे घेतलेले नाही. सरकारी शिष्ठमंडळाने गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड हे या शिष्ठमंडळात उपोषणस्थळी पोहचले होते. तरीही जरांगे यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी ११ तारखेपर्यंत प्रश्न सोडवण्याची मागणी करीत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देणार का ?

मनोज जरांगे यांनी सरकारला तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देणार का असा सवाल यावेळी केला. वंशावळ जुळली जरी ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाही, हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारच्या नियमानुसार वंशावळ ग्राह्य धरली जात नाही अशीही तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लोक अर्ज करत नाहीत. जे लोक अर्ज करणार त्यांना देणार असे सांगितले. आम्ही 10 ते 17 तारेखला कॅम्प लावतोय असेही सांगितले. यावर मराठवाडयातील मुलांनी उद्यापासुन अर्ज करावा, अर्ज केल्यानंतर जर प्रमाणपत्र दिले नाही तर पुढे बघु असे मनोज जरांगे यांनी सांगितले. तुम्हाला डिजिटलाइज करायला वेळ लागू शकतो. पण प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा ना अशीही मागणी जरांगे पाटील यांनी सांगितले.

10 तारखेच्या आत सातारा आणि कोल्हापुर संस्थानचा जीआर काढावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.  10 तारखेला बैठकीऐवजी शासन निर्णय काढावा अशी मागणी त्यांनी करताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 10 तारखेला प्रमाणपत्राविषयी आपण शासन निर्णय काढू असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी 11 तारखेपर्यंत तुम्ही काम पूर्ण करा आम्ही मग गुलाल उधळत मुंबईला येऊ असे सांगत उपोषण तोपर्यंत सुरुच राहणार असल्याचे सांगितले. 

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी