भुयार म्हणाले, मी पहिल्या दिवशीपासून महाविकास आघाडीसोबत आहे आणि राहणार. पण, शिवसेनेचे काही आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत गद्दारी केली. हे गद्दार कोण आहेत, याचा शोध आता संजय राऊत यांनी घ्यावा.
आमदारावर दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. यात दुसरं-तिसरं काही नाही. कोण-कोण सूर्याजी आहेत. हे सर्व संजय राऊत यांनी शोधावं. आमचं नाव त्यावेळी शोधलं असं त्यांचं मत होत. त्यावेळी त्यांनी ब्रम्हदेवाची उपमा दिली होती. यावेळी त्यांनी पुन्हा तो अवतार घ्यावा. आणि सगळे शोधावे. त्यामध्ये कोणकोण आहेत ते. मी कुणाचंही नाव घेणार नाही.
MLC Election 2022 : "काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार", असं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे.
हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला सामोरं यावं, मी ही तयार आहे. चित्रा वाघ यांचा भंकपपणा मला पाठ झाला आहे. खोटं बोल पण रेटून बोल असं त्यांचं काम आहे, अशी टीकाही मेहबुब शेख यांनी केलीय. ते आज अमरावतीत बोलत होते.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हे पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. खरिपातील खर्चासाठी शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या सोयाबीन आणि हरभरा विक्रीवर भर दिला आहे. कमी दर असतानाही शेतकऱ्यांनी हे धाडस दाखविले आहे. असे असताना दुष्काळात तेरावा याप्रमाणेच शेतकऱ्यांचा माल हा पावसाच्या पाण्यात वाहून गेला.
दुसरीकडे अमरावतीच्या शिरजगाव कसबा गावात काही वेळातच नाले तुडूंब भरले. त्यामुळे रस्त्यावरून वेगात पाणी वाहू लागले होते. यात दुचाकी देखील पाण्यावर तरंगताना दिसल्यात.
अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत गेला. पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल आणतात. बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आ�
सध्या शेत शिवारात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून पेरण्याच्या खर्चासाठी शेतीमालाची आवक वाढली आहे. बाजारपेठेत हरभरा, सोयाबीन आणि तुरीची आवक सुरु आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आवक मोठ्या प्रमाणात झाली असतानाच पावासाने हजेरी लावली.
महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक जण वैतागलेला आहे. मुख्यमंत्री तुम्हाला मदत करणार नसेल, भेटणार नसेल तर आमदारांचीही मोठी कुचंबणा होते,'अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.
राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीने आतापर्यंत केलेल्या कामाचा परिणाम असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. याचं कारण महाविकास आघाडीनं आतापर्यंत जे पेरलं ते उगवलं, अशी टीकाही श्रीकांत भारतीय यांनी केली.