Bacchu Kadu: माझ्या पती विरोधात लढाल तर…नवनीत राणांच्या त्या भूमिकेचं बच्चू कडू यांच्याकडून तोंडभरून कौतुक, अमरावतीत दोन कट्टरविरोधक एकत्र?
Bacchu Kadu on Navneet Rana And Ravi Rana: अमरावती महापालिका निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. बच्चू कडू यांनी कट्टर विरोधक नवनीत राणा आणि रवी राणा यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे समोर आले तर दोघांचा शाल देऊन सत्कार करण्याचा मनोदय पण व्यक्त केला आहे. अमरावतीच्या आखाड्यात काय घडतंय?

Amravati Municipal Corporation Election 2026: अमरावती महापालिका निवडणुकीत चुरस वाढली आहे. भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षातच जुंपली आहे. राणा यांनी 32 जागांवर उमेदवार उभे करून भाजपच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी (Navneet Rana- Ravi Rana) उघडपणे मैदानात उतरल्याने संघर्ष किती टोकाला गेलाय हे समोर येत आहे. दरम्यान हा धक्का कमी होता की काय म्हणून आता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आपल्या या कट्टर विरोधकांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. वेळप्रसंगी जर रवी राणा समोर आले तर आपण त्यांचा शाल देऊन सत्कार करण्याचा मनोदय सुद्धा कडूंनी व्यक्त केला. त्यामुळे अमरावतीत काय घडतंय असा सवाल मतदारच नाही तर उमेदवारांना पडलाआहे.
नवनीत राणा पतिव्रता
बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या भू्मिकेचे कौतुक केले आहे. तर काही जणांना हा राजकीय चिमटा वाटत आहे. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय उभे होते त्याचा डाव पत्नी म्हणून नवनीत राणा काढत आहेत. नवनीत राणा जरी भाजपच्या असल्या तरी त्यांच्यासाठी पती महत्त्वाचा आहे. पतिव्रता काय असली पाहिजे नवनीत राणा यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. माझ्या पतीच्या विरोधात तुम्ही लढाल तर हिंदू शेरनी भाजपच्या विरोधातील लढायला तयार आहे हे नवनीत राणा यांनी दाखवून दिले. मला नवनीत राणा आणि रवी राणा यांचं कौतुक कराव वाटतं. हिंदू शेरनी असताना नवनीत राणा यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे पत्नीचा धर्म त्या निभावत आहे. भाजप कसा आमच्या खिशात आहे जे रवी राणा यांनी सिद्ध केलं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
रवी राणांचा शाल देऊन करणार सत्कार
भाजपसाठी नुकसान महत्त्वाचं नाही. त्यांना नवनीत राणा महत्त्वाचे आहे या हिंदू शेरणी आहेत. भाजपला माहित आहे रवी राणा शिवाय काम होत नाही भाजपला रवी राणा यांना जपायचं आहे भाजपला राणा शिवाय पर्याय नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही रवी राणा शिवाय भाजपची दाढ शिजू शकत नाही युवा स्वाभिमान मूळ अचलपूर मध्ये भाजपचे चार नगरसेवक पडले ही रवी राणाची ताकद आहे. रवी राणाच्या ताकतीचे मी कौतुक करतो.वेळ आल्यास शाल देऊन त्यांचा सत्कार करणार असे मोठे कौतुकही बच्चू कडू यांनी केलं आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पहायला फक्त पोलीस आणि आमदार धावत होती, माणसं नव्हती.फडणवीस यांचा रोड शो न होता फक्त शो होता तो भंगार शो होता, असा भंगार शो कुठे झाला नाही नवनीत राणांना भाजपच्या लोकांना धडा शिकवायचा आहे नेत्यांना धडा शिकवायचा आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला.
यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर टीका
न शिकलेली बाई तिने हनुमान चालीसा अजून म्हणून दाखवली नाही- यशोमती ठाकूर यांची नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली. अमरावती-काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्या नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे विचारते.मात्र त्या बाईने अजून पर्यंत हनुमान चालीसा म्हणून दाखवली नाही असा टोला काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी लगावला. काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव जोपासणारा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहुन नवनीत राणा यांनी निवडणूक जिंकली आणि नंतर हिंदू शेरनी म्हणून समोर आली असा टोलाही ठाकूर यांनी राणा यांना लगावला.
