AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे खापर थेट या 3 खेळाडूंवर, सूर्यकुमार यादव याने थेट म्हटले, कधीही…

T-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताची सुरूवात धमाकेदार पद्धतीने झाली. मात्र, नुकताच भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव नक्कीच जिव्हारी लागणारा आहे. नेमकी चूक कुठे झाली हे सूर्यकुमार यादव याने नुकताच सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे खापर थेट या 3 खेळाडूंवर, सूर्यकुमार यादव याने थेट म्हटले, कधीही...
suryakumar yadav
| Updated on: Feb 23, 2026 | 9:01 AM
Share

टीम इंडियाला आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताला नरेंद्र मोदी मैदानात हा पराभव स्वीकारावा लागला. टी 20 विश्वचषक सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला. भारताने 11 सामने जिंकली पण हा भारताचा मोठा पराभव आहे. अहमदाबादमध्ये खेळलेला हा सामना भारतासाठी नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल. भारताला आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे उर्वरित सुपर 8 सामने जिंकावे लागतील, त्याशिवाय भारताकडे दुसरा काहीच पर्याय नसणार आहे. पुढचा सामना चेन्नईमध्ये खेळला जाईल आणि हा सामना भारतासाठी अत्यंत महत्वाचा असेल, त्यावरूनच भारताचे भविष्य ठरले जाईल. दक्षिण आफ्रिकेने आपली विजयाची घोडदाैड कायम ठेवली. त्यांचा अजून एक विजय आणि त्यांचा पुढचा मार्ग अजून सोपा होईल.

सूर्यकुमार यादव याने या पराभवानंतर मोठे विधान केले. सूर्यकुमार यादव याने म्हटले की, संघाला आता तेच करावे लागेल जे सर्वोत्तम आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगली फिल्डिंग. पुढे बोलताना सुर्यकुमार यादव याने म्हटले की, टीम कोणत्याच परिस्थितीमध्ये आपल्या खेळावर परिणाम होऊ देणार नाही आणि त्याच आक्रमतेने खेळेल. 187 चे टार्गेट पूर्ण करताना संघाने पावरप्लेमध्ये 3 विकेट गमावल्या आणि तिथेच घात झाला.

सूर्यकुमार यादव याने हे मान्य केले की, 187 चे टार्गेट पूर्ण करताना संघाने 3 विकेट गमावल्या आणि तिथेच चूक झाली. सूर्यकुमार यादव याने म्हटले की, 180 + धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये सामना जिंकता येत नाही पण तो सामना आपण हारू नक्की शकतो. पॉवरप्लेमध्ये विकेट गमावल्याने भारताला मोठा फटका बसल्याचे यावरून स्पष्ट आहे आणि सूर्यकुमार यादव यानेही हे मान्य केले.

सुरूवातीला झटपट विकेट गेल्याने सामन्यात एक मोठी भागीदारी बनू शकली नाही. सूर्यकुमार यादव याने बोलताना पुढे म्हटले की, हा पराभव झटका नाही तर एक शिकवण आहे. चुकांवर टीम काम करेल. पण कोणताही मोठा निर्णय घेतला जाणार नाही. आता रीसेट मोडमध्ये असून संघाचे ध्येय स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उपांत्य फेरीतील स्थान मिळवायचे आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...