AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमच्या आमदाराला 30 कोटींची ऑफर’, थेट मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमका रोख कुणाकडे?

Political Controversy : गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या घडांमोडींना वेग आला आहे. अशातच आता एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने विरोधकांनी आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

'आमच्या आमदाराला 30 कोटींची ऑफर', थेट मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमका रोख कुणाकडे?
Omar Abdullah NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 11, 2026 | 8:57 PM
Share

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अब्दुल्ला यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हजरतबल येथे बेगम अकबर जहाँ अब्दुल्ला (मादर-ए-मेहरबान) यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उमर अब्दुल्ला यांनी दावा केला की, जम्मू विभागातील नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराला पक्षांतर करण्यासाठी 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

पुढे बोलताना विरोधकांवर टीका करताना अब्दुल्ला म्हणाले की, ‘ते पुन्हा एकदा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मला माहिती मिळाली आहे की जम्मूतील आमच्या एका आमदाराला 20-30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आमदाराने ही ऑफर नाकारली.’ यावेळी अब्दुल्ला यांनी ऑफर मिळालेल्या आमदाराचे नाव किंवा ही ऑफर देणाऱ्या व्यक्तींचे नाव उघड केलेले नाही.

20 जुलैला जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा

उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, ‘नॅशनल कॉन्फरन्सने संघर्षाऐवजी संवादाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा यासाठी जवळपास दोन वर्षे प्रयत्न केले. मी केंद्र सरकारला त्यांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. पण आता परिस्थिती बदलली असून आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.’ आता उमद अब्दुल्ला यांनी 20 जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनातून जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार आणि भाजपला खुले आव्हान

उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर आरोप करताना म्हटले की, ‘भाजपने पक्षांतराच्या माध्यमातून मागच्या दाराने सरकारमध्ये प्रवेश करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. जर तुमची हीच भूमिका असेल, तर सार्वजनिकपणे जाहीर करा की भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाणार नाही.’

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक