राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, हिंदुत्व आणि विरोधकांच्या टीकेवर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले की, राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. सरकारने कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची अट कमी केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, हिंदुत्व आणि विरोधकांच्या टीकेवर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले की, राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. सरकारने कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची अट कमी केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजकीय टीकेवर बोलताना त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत, चांगल्या कामाचे कौतुक करण्याची त्यांची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र काही विरोधी पक्ष नेते सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, जनतेने शिक्षा दिल्यानंतर आता त्यांना रामरक्षा आठवत आहे. हिंदुत्व हे टी-शर्टप्रमाणे बदलण्याची गोष्ट नसून ते विचारांशी जोडलेले आहे, असेही त्यांनी म्हटले. राम मंदिर आणि अयोध्या विषयावर टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणे हा मोठा विरोधाभास असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारून दिले आणि दिलेला शब्द पाळला, असेही ते म्हणाले. पक्ष संघटना वाढवण्यासाठी नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय साधला जाईल. शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
Published on: Jul 11, 2026 02:29 PM
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,

