पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा ठरल्याचं सांगितलं जात आहे . पार्थ पवार आणि कायनात धर यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कायनात धर त्या सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.
कायनात धर या केवळ आनंदाच्या क्षणातच नव्हे तर कठीण काळातही पवार कुटुंबासोबत उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी बारामती आणि मुंबईतील शोकसभांनाही उपस्थिती लावली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात अधिक सक्रिय झाले असून सध्या ते पक्षाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Published on: Jul 11, 2026 12:45 PM
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...