AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : बापरे! ढग होणार गायब, पुन्हा पाऊस कधी पडणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा, ताजा हवामान अंदाज काय?

पंढरपूरची दिंडी परतल्यानंतर राज्यात पुन्हा जोरात पाऊस होईल. 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत एकदम जोराचा पाऊस होईल. हा पाऊस सगळीकडेच असेल. अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात 21 तारखेनंतर चांगला पाऊस होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

Rain Update : बापरे! ढग होणार गायब, पुन्हा पाऊस कधी पडणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा, ताजा हवामान अंदाज काय?
panjabrao dakh rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2026 | 9:00 PM
Share

Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे सगळी दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पावासाने थैमान घातले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तर अतिवृष्टी झाली. लोकांच्या घरात पाणी शिरले. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस नेमका कधी होईल, असे विचारले जात आहे. याबाबत हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी सविस्तर सांगितले आहे. पाऊस नेमका कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात होईल, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.

16 जुलैपासून पावसाला सुरुवात होणार

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आता 11 ते 14 जुलैपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे. वारा सुटेल. त्यानंतर 16 जुलैपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 16 जुलैपासून 19 जुलैच्या काळात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. हा पाऊस विखुरलेल्या स्वरुपात असेल.

आता विदर्भात होणार तुफान पाऊस

चार दिवस पाऊस थांबेल. नंतर 16 जुलैनंतर पाऊस पुन्हा सुरू होईल. राज्यात पुन्हा 21 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत चांगला आणि जोराचा पाऊस होईल. हा पाऊस राज्यातील वेगवेगळ्या भागात हा पाऊस असेल. 21 जुलैच्या नंतर सर्वाधिक पाऊस विदर्भात असेल. यात 21 जुलै ते 24 जुलैपर्यंत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, वयतमाळ, अकोला, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जालना, जळगाव या जिल्ह्यात चांगला पाऊस होईल. मुंबईत जसा पाऊस झाला, तसाच या काळात विदर्भातही पाऊस होईल, असंही भाकित डख यांनी केलं आहे. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांनी 20 जुलैपर्यंत शेतीतील सर्व कामे करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस होणार?

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंढरपूरची दिंडी परतल्यानंतर राज्यात पुन्हा जोरात पाऊस होईल. 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत एकदम जोराचा पाऊस होईल. हा पाऊस सगळीकडेच असेल. अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात 21 तारखेनंतर चांगला पाऊस होईल. अनेक ठिकाणी अजूनही पाऊस झालेला नाही. यामध्ये नंदूरबार, सोलापूर या जिल्ह्यातील काही भागांचा समावेश आहे. लातूर, धाराशीव, बीड, बीड, नांदेड, सांगली या जिल्ह्यातील काही भागातही अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. या भागातही 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या काळात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस होईल. नंदूरबार जिल्ह्यात 15 जुलैच्या नंतर पाऊस पडेल, असा महत्त्वाचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक