MVA PC | राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक… विजय वडेट्टीवार सरकारवर बरसले
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ” हा स्लोगन घेऊन सत्ता मिळाली होती, पण आज महाराष्ट्र कुठे आहे? शेतकरी, बेरोजगारी आणि गुंतवणूक या सगळ्या बाबतीत राज्य मागे आहे. फक्त घोषणाच होतात आणि लोकांची फसवणूक केली जाते. ड्रग्सच्या प्रकरणात महाराष्ट्राला जगभर चर्चा मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते एकत्र येत विरोधी पक्षाच्या वतीने संवाद साधण्यासाठी माध्यमांसमोर आले आहेत. या पत्रकार परीषदेत कँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार, उबाठा गटाचे खासदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंटी पाटील, उबाठा गटाचे माजी मंत्री अनिल परब, काँग्रेस नेते अमीन पटेल आणि उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव हे उपस्थित आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ” हा स्लोगन घेऊन सत्ता मिळाली होती, पण आज महाराष्ट्र कुठे आहे? शेतकरी, बेरोजगारी आणि गुंतवणूक या सगळ्या बाबतीत राज्य मागे आहे. फक्त घोषणाच होतात आणि लोकांची फसवणूक केली जाते. ड्रग्सच्या प्रकरणात महाराष्ट्राला जगभर चर्चा मिळाली आहे. अशा परिस्थितीत चहापानाला जाणे योग्य आहे का?, हा प्रश्न आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातावरही प्रश्न उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले की, शासनाकडून फक्त दोन ओळींची माहिती दिली गेली आणि यावर कुणीही प्रश्न विचारू नये, असे सांगणे योग्य नाही. हा अपघात, घातपात आहे की अपघात, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि देशभर या प्रकरणाची चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही का सहभागी होऊ, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Published on: Feb 22, 2026 03:45 PM
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,

