AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

Nagpur Protest : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशाच एका आंदोलनानंतर आज रात्री उशिरा नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Nagpur ProtestImage Credit source: X
| Updated on: Jul 22, 2026 | 11:34 PM
Share

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशातच आज राज्यातील विविध भागात आंदोलने करण्यात आली. आज रात्री उशिरा नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नागपुरात आंदोलकांची धरपकड

नागपूरच्या संविधान चौकात काक्रोज जनता पार्टीकडून सायंकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन करण्यात आले. काही कार्यकर्ते आंदोलनाची वेळ संपल्या नंतर निघून गेले, मात्र जवळपास 100 कार्यकर्ते आंदोलन स्थळी होते. पोलीसांनी कार्यकर्त्यांना आंदोलन स्थळावरून जाण्यासाठी सांगितले मात्र आंदोलकांनी जागा न सोडता घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी अखेरीस आंदोलकांना जागा खाली करण्यात 10 मिनिटे दिली होती, मात्र तरीही आंदोलकांनी जागा सोडली नाही, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे काही काळा संविधान चौकात तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

जंतर मंतरवर राडा

दिल्लीतील जंतर मंतरवर रात्री साडे आठच्या आसपास राडा झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. यात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या जंतर मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तलवार फिरवल्याचा आरोप

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी काही लोकांना तलवार फिरवली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळानंतर परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. यानंतर काही आंदोलनकर्ते कॅनॉट प्लेस आणि टॉलस्टॉय मार्गावर जमले होते. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याने ते निघून गेले. सध्या कॅनॉट प्लेस, टॉलस्टॉय मार्ग आणि जंतर-मंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Follow Us
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?