मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सैम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच दरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला, त्यानंतर या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे, तसेच आश्रुधुराच्या नकळांड्या देखील फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इथे आता तणावाचा वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान सोमवारी सीजेपीच्या आंदोलकांनी शिक्षणं मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढला होता. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला होता, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेत अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं.
दरम्यान या घटनेनंतर आंदोलकांनी पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. आज पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहयला मिळालं. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत आहे, दिल्लीत तर आंदोलन सुरूच आहे, मात्र आता विविध राज्यांमधील अनेक शहरांमध्ये देखील या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विद्यार्थी आंदोलन करत असल्याचं पहायला मिळत आहे.
