AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

मोठी बातमी! दिल्लीत राडा... तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
Jantatr Mantar Stone PeltingImage Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 11:02 PM
Share

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोनल सुरू आहे. या आंदोलनादरम्यान जंतर-मंतर परिसरात पुन्हा एकदा राडा झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. यात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या जंतर मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तलवार फिरवल्याचा आरोप

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी काही लोकांना तलवार फिरवली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळानंतर परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. यानंतर काही आंदोलनकर्ते कॅनॉट प्लेस आणि टॉलस्टॉय मार्गावर जमले होते. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याने ते निघून गेले. सध्या कॅनॉट प्लेस, टॉलस्टॉय मार्ग आणि जंतर-मंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनात काही अराजक प्रवृत्तीचे लोक शिरले होते. त्यांनी दगडफेकीनंतर पोलिसांवर पाण्याच्या बाटल्याही फेकल्या. संसद मार्गावर रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला तसेच अश्रुधूराचे गोळे सोडावे लागले.

कॅनॉट प्लेसचे ACP विवेक भगत जखमी

आंदोलकांच्या दगडफेकीत आणि बाटल्यांच्या हल्ल्यात कनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने आरएमएल रुग्णालयात दाखल केले. सूत्रांच्या माहितीनुसार, टॉलस्टॉय मार्गावर आंदोलकांनी पोलीस आणि RAF जवानांवर मोठे दगड फेकले. काही आंदोलकांनी लाठ्यांनीही पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन ते तीन अश्रुधूराचे गोळे सोडले आणि अखेर परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांकडून शांततेचे आवाहन

या घटनेनंतर दिल्लीतील राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर हालचाली वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच