AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bacchu Kadu: आता न्यायाधीश खतरे में….अमरावतीत न्यायाधीशांच्या निवासस्थानावर चोरांचा डल्ला, बच्चू कडूंचा सरकारला चिमटा

Bacchu Kadu Criticized State Government: अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे. शहरात थेट पाच न्यायाधीशांच्या घरांवर चोरट्यांनी हातसफाई केली आहे. न्यायाधीशांच्या निवासस्थानावरच चोरट्यांनी डल्ला मारला. त्यावरून आता बच्चू कडूंनी सरकारला जोरदार चिमटा काढला आहे.

Bacchu Kadu: आता न्यायाधीश खतरे में....अमरावतीत न्यायाधीशांच्या निवासस्थानावर चोरांचा डल्ला, बच्चू कडूंचा सरकारला चिमटा
बच्चू कडू , अमरावती न्यायाधीश निवासस्थानImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 15, 2026 | 2:16 PM
Share

Bacchu Kadu Criticized State Government: अमरावतीत चोरट्यांनी पोलिसांनाच नाही तर न्याययंत्रणेला पण आव्हान दिले आहे. चोरट्यांच्या धाडसाची आणि पोलिसांच्या धाकाची एकच चर्चा राज्यभर चर्चा रंगली आहे. अमरावतीत पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल केल्या जात आहे. कारण ही तसंच आहे. अमरावतीत पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींवरून राज्यात खळबळ उडालेली असतानाच आता बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार केला आहे. त्यांनी सरकारचं मापच काढलं आहे.

घटना तरी काय?

अमरावती येथील कांतानगरमध्ये न्यायाधीशांची आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आहे. त्यातील पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी हातसफाई केली. त्यांनी चोरी केली. चोरांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेवेळी न्यायाधीश हे कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. पण न्यायाधीश आणि कर्मचारी सुट्टीनिमित्त बाहेर गावी असल्याचे हेरूनच ही चोरी झाल्याचे सध्या तरी समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पण न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात. त्यांच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असतो. अशावेळी या परिसरात चोरट्यांनी हे अचाट धाडस केलेच कसे असा सवाल केल्या जात आहे. तर विरोधकांना या चोरीच्या घटनेमुळे आयते कोलीत हाती लागले आहे. बच्चू कडूंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

राज्यात न्यायाधीश खतरे में

अमरावतीच्या कांतानगर मधील पाच न्यायाधीशांच्या आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाल्याप्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. चोरांनी आता न्यायाधीशाच्या घरावर दरोडे टाकले आता त्यांनी मंत्र्यांच्या घरावर दरोडे टाकले पाहिजे.. तसंही हे सरकार शेतकऱ्यांच्या घरावर रोज दरोडे टाकत आहे; न्यायाधीशाच्या घरावर दरोडा पडते त्याची बातमी होती पण रोज शेतकर्‍यांच्या घरावर दरोडा पडते त्याचं काय? असा सवाल त्यांनी केला.

या देशात हिंदू खतरे मे है म्हटले जाते आता न्यायाधीश देखील खतरे मे आले आहे. बटेंगे तो कटेगे म्हटलं जातं परंतु आता न्यायाधीशांवरच बटण्याची वेळ आली आहे. देवा भाऊ तुमची वानरसेना केव्हा काम करणार तुमच्याकडे गृह खातं आहे. न्यायाधीशाच्या घरी जर चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचे काय राहिलं. देवा भाऊ तुमचं नाव आहे पण देवासारख राज्य येणार कधी तुमच्याकडून अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा