AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळात न राहात जमिनीवर फिरताताना दिसतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते जमिनीवर येतात. तसेच या काळात ते आपल्या सुरक्षेसाठी काही झाडांचा आधार देखील घेतात.

हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील
snakesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 04, 2026 | 11:23 PM
Share

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो, बिळातून बाहेर पडलेले साप हे आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधत असतात. जिथे कोरडी आणि थंड जागा आहे, तसेच पुरेसा अंधार आहे, अशा जागी साप लपून बसतात. अशी जागा जर सापांना तुमच्या घरात मिळाली तर साप तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांपासून बचावाची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकांना बाग कामाची आवड असते, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बागेत विविध झाडं लावतो, परंतु यातील काही झाडं ही अशी असतात, जी सापांना आमंत्रण देणारी ठरतात. साप हा त्या झाडांना असलेल्या विशिष्ट वासामुळे झाडाकडे आकर्षित होतो, असा काही ठिकाणी गैरसमज असतो. परंतु प्रत्यक्षात तसं काहीही नसतं.

तर या झाडाची नैसर्गिक रचनाच अशी असते  की सापाला या झाडाभोवती सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते. जसं की सापांना निवाऱ्यासाठी ज्या ठिकाणी आद्रता जास्त आहे, तसेच अडचण असेल असे ठिकाणं सुरक्षित वाटतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत पाऊस पडत असतो, त्यामुळे काही झाडांभोवती नैसर्गिकरित्या तसं वातावरण निर्माण होतं आणि साप या झाडांकडे आकर्षित होतात, त्यामुळे शक्यतो अशी झाडं घराच्या जवळ लावणं टाळली पाहिजेत.

यापैकीच एक झाडं म्हणजे बांबूचं झाडं. बांबूच्या झाडाला दाट पानं असतात, त्यामुळे या झाडाभोवती नेहमी अडचण असते. तसेच पाला सतत खाली पडत असल्याने जमीन देखील पावसाच्या पाण्यामुळे ओली होत नाही, त्यामुळे सापांना सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते. अनेकदा साप अंडी घालण्यासाठी अशाच झाडांची निवड करतता. अशा झाडांमध्ये अंडी लपवणं सहज शक्य होतं, अंडी लपवल्यामुळे त्यांचं इतर साप व शत्रू प्राण्यंपासून संरक्षण होतं. त्यामुळे साप अनेकदा बांबुच्या झाडाच्या आसपास अंडी घालतात. त्यामुळे शक्यतो अशी झाडं घरापासून थोडी दूर लावावीत. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना द्या, ते त्याला सुरक्षित आधिवासात सोडतील.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ