AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समोरच्याला ज्या भाषेत कळते त्याच… महायुतीतील भाजप शिवसेनेमधील संघर्ष तीव्र, ‘त्या’ विधानाच्या समर्थनाने वाद वाढला

jalgaon bjp shivsena dispute: जळगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यात वाद, मुलगा सुमितच्या वक्तव्याचे किशोर पाटलांकडून समर्थन करण्यात आलं आहे.

समोरच्याला ज्या भाषेत कळते त्याच... महायुतीतील भाजप शिवसेनेमधील संघर्ष तीव्र, 'त्या' विधानाच्या समर्थनाने वाद वाढला
Mahayuti Jalgaon NewsImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 6:44 PM
Share

 खेमचंद कुमावतस टीव्ही९ मराठी प्रतिनिधी :  जळगावमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यातील वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, किशोर पाटील यांनी मुलगा सुमित यांच्या वक्तव्याचे समर्थन करत मंगेश चव्हाण यांच्यावरच पलटवार केला आहे.

उमेदवारी अर्जाच्या वादातून संघर्षाला सुरुवात

महायुतीच्या मेळाव्यात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज आपणच अवैध केला होता आणि त्यानंतर तो वैध करण्यासाठीही आपणच प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले होते. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर सुमित पाटील यांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यानंतर किशोर पाटील यांनी मुलाच्या वक्तव्याचे समर्थन केले.

महायुतीच्या मेळाव्यात भरसभेत एखादा आमदार उमेदवारी अर्ज अवैध केल्याचे सांगत असेल, तर आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करत नाही, असे किशोर पाटील म्हणाले. सुमित पाटील यांचा स्वाभिमान जागृत झाल्यामुळे त्यांनी समोरच्याला ज्या भाषेत उत्तर कळते, त्याच भाषेत उत्तर दिले, असेही त्यांनी सांगितले.

मंगेश चव्हाण यांचा संस्कारांवरून टोला

दरम्यान, सुमित पाटील यांच्या वक्तव्यावर मंगेश चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. किशोर पाटील यांनी आपल्या मुलाला आवर घातला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सुमित यांच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केला. खालच्या भाषेत वक्तव्य करणे हे आपले संस्कार नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले. तसेच एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याकडे असतात, याचा विचार समोरच्याने करावा, असा टोला त्यांनी लगावला.

किशोर पाटलांचा पुन्हा पलटवार

मंगेश चव्हाण यांच्या संस्कारांवरील टीकेला किशोर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले. भाजपचा आणि महायुतीचा जबाबदार आमदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत असेल, तर आधी त्यांनी स्वतःचे संस्कार तपासावेत, असे किशोर पाटील म्हणाले.

त्यामुळे जळगावमध्ये उमेदवारी अर्जाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद आता दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत आला आहे. महायुतीच्या मेळाव्यात सुरू झालेला हा वाद आता संस्कार आणि स्वाभिमानाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचला आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!