AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics: ‘2029ला मविआचं सरकार, फक्त 2 चकरा मारण्यासाठी पालकमंत्री करा’ शरद पवारांच्या खासदाराने मनातलं सांगितलं

गृहमंत्री जाऊ द्या पण मला सरकार आल्यावर सहा महिने पालकमंत्री करा. मला शिर्डीतून वाँग वाँग करत नगरला गाडी आणायची आहे अन् परत शिर्डीला जायचं आहे," अशी इच्छा खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. 

Maharashtra Politics: '2029ला मविआचं सरकार, फक्त 2 चकरा मारण्यासाठी पालकमंत्री करा' शरद पवारांच्या खासदाराने मनातलं सांगितलं
| Updated on: Nov 22, 2026 | 6:16 PM
Share

कुणाल जयकर प्रतिनिधी: ‘महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सहा महिने पालकमंत्री करा, सहा महिने गृहमंत्री करा मगं सगळ्यांच्या बत्त्यागुल केल्या नाही तर बघा असं म्हणत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे केली . जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. नेमकं काय काय म्हणालेत? वाचा सविस्तर..

काय म्हणाले निलेश लंके? 

“पोलीस लोक खूप त्रास द्यायचे, मी त्यांना सांगितले थांबा जरा सरकार येऊ दे. सहा महिने मला पालक मंत्री करा अन् सहा महिने गृहमंत्री करा. गृहमंत्री जाऊद्या पण मला सरकार आल्यावर सहा महिने पालकमंत्री करा. मला शिर्डीतून वाँग वाँग करत नगरला गाडी आणायची आहे अन् परत शिर्डीला जायचं आहे,” अशी इच्छा खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.

पुढे बोलताना  “या दोन चकरा मारल्या अन् मला घरी जा म्हटले तर घरी जाईन तुम्हालाही माहिती आहे मी तुमच्या सगळ्यांच्या शब्दावर एकवर्ष आधी विधानसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तुम्ही मला फक्त दोन चकरा शिर्डी ते नगर अन् नगर ते शिर्डी मारायला दिल्या. नंतर गाडी सोडून एसटीने यायला सांगितले तरी मी येईन,” असं निलेश लंके म्हणाले.

2029 ला मविआचं सरकार! 

त्याचबरोबर  पुढे लाल दिव्याच्या गाड्या अन् मागे लाल दिव्याच्या गाड्या. कलेक्टर साहेब डायऱ्या घेऊन माझ्या मागे, असे म्हणत साहेब हसले म्हणजे करतील, अशी मिश्किल कोपरखळीही त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना लगावली. 2029 ला आपले जुळेल, म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, असं म्हणत सगळ्यांचा हिशोब चुकता होईल असा इशाराही यावेळी निलेश लंके यांनी दिला.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला. निलेश लंके यांनी पारनेर विविध सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत भारतीय जनता पक्षाच्या राहुल शिंदे यांचा पराभव केला. या निवडणुकीत 104 मतांपैकी निलेश लंके यांना 63 मते मिळाली.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!