AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon DCC Bank Election: जळगावमध्ये महायुतीत महाभारत! शिंदेंचे आमदार संतापले, गुलाबराव पाटलांना सुनावलं

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील संघर्षावर गुलाबराव पाटलांनी याबाबत मध्यस्थी करून दोघांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरुनही आमदार किशोर पाटील यांनी थेट गुलाबराव पाटलांना टार्गेट केले.

Jalgaon DCC Bank Election: जळगावमध्ये महायुतीत महाभारत! शिंदेंचे आमदार संतापले, गुलाबराव पाटलांना सुनावलं
| Updated on: Nov 22, 2026 | 6:45 PM
Share

खेमचंद कुमावत प्रतिनिधी:  जळगावमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. महायुतीच्या मेळाव्यात मंगेश चव्हाण यांनी मुलगा सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज आपणच अवैध केला आणि नंतर वैध करण्यासाठीही आपणच प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. आता आमदार किशोर पाटील यांनी मुलगा सुमित यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

आमदार किशोर पाटील यांच्याकडून मुलाच्या विधानाचे समर्थन..! 

“महायुतीच्या भर मेळाव्यात मी अर्ज अवैध केला असं एखादा आमदार म्हणत असेल तर आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करत नाही. महायुतीच्या मेळाव्यात सुमित पाटील याचा स्वाभिमान जागृत झाला म्हणून त्याने समोरच्याला ज्या भाषेत उत्तर कळत असेल त्या भाषेत त्यांनी उत्तर दिले,” असे म्हणत आमदार किशोर पाटील यांनी मुलाच्या विधानाचे समर्थन केले.

तसेच “एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोट आपल्याकडे आहे, असा समोरच्याने विचार करायचा. भाजपाचा महायुतीचा जबाबदार आमदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकून मी उमेदवारी अर्ज दाखल केला असं सांगायची हिंमत करत असेल तर पहिले आपले संस्कार तपासा,” असा घणाघात किशोर पाटील यांनी केला आहे.

गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील संघर्षावर गुलाबराव पाटलांनी याबाबत मध्यस्थी करून दोघांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरुनही आमदार किशोर पाटील यांनी थेट गुलाबराव पाटलांना टार्गेट केले.

“गुलाबराव पाटलांनी व अन्य कोणी मला समजाविण्याचा प्रयत्न करू नये. तेवढी अक्कल , बुद्धी व क्षमता आमच्यात आहे,” अशी टीका किशोर पाटील यांनी केली आहे. गुलाबराव पाटलांच्या प्रतिक्रियेवर आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारीवरुन झालेल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील वादंग तीव्र होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!