AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

Ketan Agrawal : केतनची हत्या त्याची होणारी बायको सिया आणि तिचा प्रियकर चेतनने केली असल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतनच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन
Ketan agrawal grandfather diedImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 04, 2026 | 10:53 PM
Share

संपूर्ण देशात सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. केतनला त्याची होणारी बायको सियाने लोहगड किल्ल्यावरून तिचा प्रियकर चेतनच्या मदतीने खाली ढकलले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांची कसून चौकशी सुरू आहे. केतन हा लग्नासाठी पसंत नसल्याने सियाने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतनच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला असून एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केतनच्या आजोबांचे निधन

समोर आलेल्या माहितीनुसार केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या स्टेट्सवर ‘मिस यु डॅड’ अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या निकटवंतीयांनीही याला दुजोरा दिला आहे. देवीचंद अग्रवाल असं केतनच्या आजोबांचे नाव होते. ते आजारी होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या आधी त्यांची हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. नातू केतनची हत्या झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काहीवेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती समोर आली आहे. हा अग्रवाल कुटुंबाला मोठा धक्का मानला जात आहे.

पोलिसांनी दिली मोठी माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे दोघं एकमेकांसोबत कोड वर्डमध्ये बोलत होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचे फोन जप्त केले आहेत. या घटनाक्रमाबद्दल चेतनकडे कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच सियाकडे देखील चौकशी करण्यात आली आहे, गुरुवारी सकाळी आम्ही सियाचा दुसरा मोबाईल देखील जप्त केला आहे. यापूर्वी सिया आणि चेतन यांचा एक -एक मोबाईल फोन पोलिसांनी आधीच जप्त केला होता. दुसऱ्या मोबाईलमधून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता हा मोबाईल फोन फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांनी कोड वर्डमधून नेमकं काय संभाषण केलं आणि त्याचा संबंध हा केतनच्या हत्येशी आहे का? याचा उलगाडा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ