AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता मंगेशकर यांना न घेताही गाजवली इंडस्ट्री, असा हा एकमेव संगीतकार…

ओ. पी. नय्यर यांच्या संगीतामध्ये एक प्रकारचा रांगडेपणा होता. पंजाबच्या मातीचा सुगंध आणि उत्स्फूर्तपणा होता देखील होता. हिंदी चित्रपटसंगीतातील प्रस्थापित परंपरेपेक्षा त्यांची संगीतशैली निश्चितच वेगळी होती.

लता मंगेशकर यांना न घेताही गाजवली इंडस्ट्री, असा हा एकमेव संगीतकार...
aasha bhosale, rafi saheb and op
| Updated on: Nov 25, 2026 | 11:48 PM
Share

लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे स्वर्गीय अनुभूती, तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार आवाज, अशा दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्याशिवाय इंडस्ट्रीत कोणा संगीतकाराचे पान हलत नव्हते. त्या काळातील एक संगीतदार असलेल्या अवलियाने लतादीदींशिवाय आपली कारकीर्द उभी केली. त्यांनी लतादीदींना काही ठरवून गाणी दिली नाहीत असेही नाही. तर त्याकाळात सर्वच लता दीदींना आपले एक तरी हुकूमी गाणे देत असताना त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला. लतादीदींनी ना कधी त्यांच्याविषयी अनुद्गार काढले आणि ना लतादीदींविषयी त्यांनी तक्रार केली. दोघांनी एकमेकांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक महान संगीतकार होऊन गेले आहेत. त्यातील एका बिलंदर संगीतकाराची कहाणी आज आपण वाचणार आहोत. या संगीतकारांची शैली इतकी वेगळी होती की त्यांची मेलडीएस गाणी आजही गुणगुणावीशी वाटतात. हा संगीतकार फाळणी आधीच्या पंजाबमध्ये जन्माला आला होता. स्वातंत्र्यानंतर तो भारतात आला. उंचपुरा आणि देखणा असा हा अवलिया संगीतकार अतिशय स्पष्ट बोलणारा होता. त्यामुळे त्याचे जर एखाद्याशी बिनसले तर तो तेथेच त्याचा हिशेब करायचेत, त्यामुळे त्यांचे इंडस्ट्रीत अनेकांशी पटलेही नाही.

त्यांना सुरुवातीला १९५२ मध्ये ‘आसमान’ नावाचा एक चित्रपट स्वतंत्र संगीतकार म्हणून मिळाला. त्यांना निर्माता दलसुखलाल पांचोली यांनी विचारे तुम्हाला कोण हवे लता की गीता दत्त ? त्यांनी गीता दत्त यांची निवड केली. त्यानंतर त्यांनी कधी लता दीदींसोबत काम केले नाही. त्यांनी लताचा दीदींचा नेहमीच आदर केला. आणि लतादीदींनी देखील त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करत त्यांची गाणी खरोखरच वेगळ्या धर्तीची होती असे म्हटले होते.

‘आसमान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. मात्र, त्यातील संगीत आजही रसिक गुणगुणतात. ‘पॉम पॉम पॉम बाजा बोले’, ‘अरे क्या हूँ मैं’, ‘देखो जादू भरे मोरे नैना’ आणि अप्रतिम सुंदर ‘दिल है दीवाना’ ही गाणी आजही ऐकणाऱ्यांची कमी नाही. मात्र, चित्रपट न चालल्याने ओ. पी. नय्यर आणि गीता दत्त यांना पुन्हा एकत्र काम केले नाही. अखेर गीता दत्त यांनीच १९५३ मध्ये ‘बाज’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक गुरुदत्त यांना ओ. पी. नय्यर यांचे नाव सुचवले.

मृत्यूनंतर आशाताईंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही

ओंकार प्रसाद म्हणजेच ओ. पी. नय्यर यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘रिदम किंग’ बिरुद लावले जाते. नय्यर यांनी कधीही स्वरसम्राज्ञी लता दीदींना घेऊन गाणे ध्वनीबद्ध केले नाही. तरीही त्यांची गाणी आजही क्लासिक म्हणून ओळखली जातात. त्यांनी सुरुवातीला गीता दत्त यांच्या सोबत काम केली आणि एकाहून ठेका धरायला लावणारी गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत. त्यांनी नंतर आशाबाईंबरोबरही काम केले. त्यानंतर त्यांच्यात काही कारणांनी वितुष्ठ आले.

इतके वितृष्ठ आले की त्यांच्या मृत्यूनंतर आशाताईंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही असे म्हणतात. लता दीदींबद्दल बोलताना एकदा ओ. पी. नय्यर म्हणाले होते की आशाताईंना आर. डी. बर्मन यांनी जरी अनेक मेलेडियस गाणी दिली असली तरी अगदी दर्दी आणि अवघड क्लासिक चाली त्यांनी लता दींदीसाठीच राखून ठेवल्या. त्याचे उदाहरण देताना त्यांनी चित्रपट ‘तिसरी कसम’ आणि ‘आराधना’ या चित्रपटातील गाण्यांचा उल्लेख केला होता.

प्रमुख गाजलेली गाणी

• पुकारता चला हूँ मैं (मेरे सनम) • इशारों इशारों में दिल लेनेवाले (कश्मीर की कली) • दीवाना हुआ बादल (कश्मीर की कली) • माँग के साथ तुम्हारा (नया दौर) • आँखों ही आँखों में (सी.आय.डी.) • बाबूजी धीरे चलना (आर पार) • कभी आर कभी पार (आर पार) • आइए मेहरबाँ (हावडा ब्रिज) • बहुत शुक्रिया बडी मेहरबानी (एक मुसाफिर एक हसीना) • कजरा मोहब्बत वाला (किस्मत) • ये है बॉम्बे मेरी जान (सी.आय.डी.)

ओ. पी. नय्यर आणि गीता दत्त यांची गाजलेली गाणी

• बाबूजी धीरे चलना – आर पार • ये लो मैं हारी पिया – आर पार • मेरा नाम चिन चिन चू – हावडा ब्रिज • जाता कहाँ है दीवाने • कैसा जादू बलम तुमने डारा – 12 ओ क्लॉक

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार