AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी कधी मनात भीती वाटते…पिता शक्ती कपूर यांचे लेक श्रद्धा कपूरबद्दल भावूक उद्गार…

Actress श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'ईठा' (Eetha) हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या आधी तो २८ ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. परंतू इतर मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा टाळण्यासाठी हा सिनेमा आता येत्या चार तारखेला येत आहे.

कधी कधी मनात भीती वाटते...पिता शक्ती कपूर यांचे लेक श्रद्धा कपूरबद्दल भावूक उद्गार...
Actress shraddha Kapoor film eetha
| Updated on: Nov 24, 2026 | 8:28 PM
Share

Bollywood अभिनेत्री shraddha Kapoor हीचा ‘विठा'( ईटा ) हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ‘छावा’ फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ईठा हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची जीवनगाथा चितारण्यात आली आहे. या चित्रपटात विठाबाईची मुख्य भूमिका श्रद्धा कपूर यांनी केली आहे. छावाच्या यशानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. या चित्रपटाचा कॅनव्हास भव्य आहे. या चित्रपटातून हिंदी भाषिक पट्ट्यातही महाराष्ट्राची लुप्त होत चाललेली ‘तमाशा’ ही कला आणि तमाशासाठी फडावर नाचणाऱ्या विठाबाईचे जगणे 70 एमएमच्या पडद्यावर प्रथमच समोर येणार आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हीने या एकाच चित्रपटासाठी अनेक ऑफर नाकारल्या आहेत. या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा कस दाखवला असून त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याची तिला आणि तिचे वडील अभिनेते शक्ती कपूर यांनाही उत्सुकता लागली आहे. शक्ती कपूर यांनी हिंदीपटात व्हिलन आणि नंतर कॉमेडी व्हिलन असा प्रवास केला आहे. मात्र, त्यांना त्यांच्या लेकीचा हा चित्रपट चांगला चालावा असे वाटत आहे. एक बाप म्हणून तर त्यांची ही अपेक्षा आहेच. परंतू आपल्या मुलीचे सतत रिहर्सल करुन घुंगरांचे वजन पेलून सुजलेले पाय त्यांनी पाहिले आहेत. शक्ती कपूर यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलंय की माझी मुलगी गेले काही वर्षे या चित्रपटाशी एकरुप झाली आहे. ती कमीच चित्रपट स्वीकारते आणि मन लावून काम करते. तिचे सुजलेले पाय पाहिले की तिची मेहनत लक्षात येते. ती एक चांगली नृत्यकारा आहे. तिची मेहनत फळाला यावी अशीच मला इच्छा आहे. हल्लीचे तणावाचे दिवस, इन्कम टॅक्सचा ससेमिरा, हे सर्व पाहिले की मला कधी..कधी मनात भिती वाटते. मला तिचा ईठा पाहण्याचे भाग्य लाभू दे असे ते डोळ्यात आसवं आणू म्हणतात. माझी मुलगी मराठी आहे, तिची आई मराठी आहे असं ते अभिमानाने म्हणतात.

दिग्दर्शक संजय उतेकर यांनी खरेतर छायाचित्रकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी ‘टपाल’ (२०१४) या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लुका छुप्पी’ (२०१९), ‘मिमी’ (२०२१), ‘जरा हटके जरा बचके’ (२०२३) आणि ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (२०२५) साकारला आहे. आता छावाच्या सुपरडुपर यशानंतर श्रद्धा कपूर हिच्या सोबत ‘ईठा’हा चित्रपट घेऊन ते आले आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होत आहे.

श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ईठा’ (Eetha) हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या आधी तो २८ ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. परंतू इतर मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा टाळण्यासाठी हा सिनेमा आता येत्या चार तारखेला येत आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी