AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!

शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!

| Updated on: Nov 24, 2026 | 5:54 PM
Share

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठीच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढला आहे. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड, आणि अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. "एक इंचही जमीन देणार नाही" असा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठीच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मसवे गावामध्ये मोजणीसाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली, तसेच मोजणीसाठी वापरण्यात आलेल्या मशिन्स आणि वाहनांचेही नुकसान करण्यात आले. संतप्त शेतकऱ्यांनी मोनार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून हुसकावून लावत काम बंद पाडले. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील खानापूरमधील नेवरी माहुली परिसरातही मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यामध्ये कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील यांचाही समावेश आहे. वाळवा तालुक्यातील कुरळपमध्ये शेतकऱ्यांनी मॅपिंगची गाडी अडवून कागदपत्रांची तपासणी केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना परत पाठवले. “सरकारने कितीही दडपशाही केली तरी एक इंचही जमीन देणार नाही,” असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

Published on: Nov 24, 2026 05:54 PM

Follow Us