AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिया-केतन प्रकरणाने तरुणांमध्ये भीतीचं वातावरण; लग्नाआधी गुपचूप घेताहेत गुप्तहेराची मदत, कारण काय?

siya ketan agarwal case : केतन अग्रवाल हत्याकांडामुळे तरुणांसहित पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे तरुणाई, पालक गुप्तहेरांकडून विवाहाआधी होणाऱ्या पार्टनरची माहिती जाणून घेत आहेत.

सिया-केतन प्रकरणाने तरुणांमध्ये भीतीचं वातावरण; लग्नाआधी गुपचूप घेताहेत गुप्तहेराची मदत, कारण काय?
| Updated on: Jul 04, 2026 | 10:20 AM
Share

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे. या प्रकरणाचे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सियाने होणाऱ्या नवऱ्याची प्लान करून हत्या केल्यानंतर तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकेकाळी लग्नाआधी कुंडली जाणून घेणारे मंडळी आता होणाऱ्या पार्टनरचं गुन्हेगारी रेकॉर्ड, कर्ज, सोशल मीडियावरील प्रोफाईलची माहिती घेत आहेत. सिया-केतन, सोनम-राजा रघुवंशी प्रकरणामुळे लग्नाआधी तरुण आता होणाऱ्या पार्टनरच्या चारित्र्य पडताळणी करण्याच्या ट्रेंडकडे वळू लागले आहेत.

लग्न करण्याआधी तरुणाई पार्टनरच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत. तसेच पार्टनरची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची तपासणी करण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. दिल्लीतील एस्कॉन डिटेक्टिव्ह एजन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय कपूर यांनी सांगितलं की, आम्ही 10 ते 15 जण विवाहाआधी पार्टरनरचं चारित्र्याविषयी माहिती जाणून घ्यायला यायची. आता आकडा दुप्पट झाला आहे. आता छोट्या शहरातील लोकही आमच्या सारख्या गुप्तहेरांची मदत घ्यायला येत आहेत.

कोणत्या 4 प्रकारच्या विवाहांसाठी चौकशी होते?

ठरवून केलेला विवाह (कुटुंबाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी) प्रेम विवाह (पार्टनरची विश्वासार्हता तपासण्यासाठी) पुनर्विवाह (घटस्फोटाचं कारण जाणून घेण्यासाठी) एनआरआय (परदेशात नोकरी आणि नागरिकत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी)

गुप्तहेरांकडून चारित्र्य, सामाजिक दर्जा, कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती तपासणी केली जाते. तसेच होणार्‍या पार्टनरची गुन्हेगारी रेकॉर्ड, आर्थिक फसवणूक, इतर कायदेशीर प्रकरणाची माहिती जाणून घेतली जाते.

तरुणांमध्ये भीतीचं वातावरण?

शहरात विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे समाजात एकमेकांशी होणारा थेट संवाद कमी झालाय. त्यात लोकांचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे आता फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अलीकडे घडलेल्या सिया-केतन आणि सोनम-राजा रघुवंशी प्रकरणाने तरुण-तरुणींसहित पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लग्नानंतर काही पार्टनरचे आर्थिक घोटाळे, गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येऊ लागली आहे. तर काहींना लग्नानंतर होणाऱ्या हिंसाचाराचाही सामना करावा लागत आहे. आता व्यक्तीच्या दिसण्या आणि बोलण्यावरून त्याच्या चारित्र्याचा अंदाज लावणे अवघड झालं आहे. त्यामुळे पालकांना मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालक, तरुण गुप्तहेरांकडून लग्नाआधीच पार्टनरची संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत.

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर