कचऱ्याचा डोंगर खोदला, अचानक सापडला 3400 वर्ष जुना शापित खजिना, ठक ठकचा आवाज आला अन्…
इजिप्तमधील थीब्स मंदिराजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 3400 वर्षांपूर्वीचा 'शापित खजिना' सापडला. 40 जळालेले पपायरसचे तुकडे प्राचीन अपोफिस रिच्युअलशी संबंधित आहेत, ज्यामुळे सूर्य देवतेच्या प्रकोपाची कामना केली जात असे. या शोधाने इजिप्शियन संस्कृतीतील या विधीच्या प्राचीनतेबद्दलच्या समजूती बदलल्या आहेत,,

इजिप्तमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. थीब्स मंदिराच्या भग्नावशेषाच्या जवळ एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 3400 वर्ष जुना खजिना सापडला आहे. संशोधकांना या ठिकाणी पूर्ण पुस्तक मिळालं नाही. तर टपालाच्या तिकीटाच्या आकाराचे 40 जळालेले पपायरसचे तुकडे सापडले आहेत. ही माहिती ‘जर्नल ऑफ द इजिप्शियन लँग्वेज अँड एंटिक्विटीज’मध्ये छापून आली आहे. हे तुकडे प्राचीन इजिप्तच्या प्रसिद्ध अपोफिस रिच्युअलशी संबंधित आहे. या शापाच्या माध्यमातून सूर्य देवतेच्या प्रकोपाची कामना केली जात होती. पुरातत्त्व विभागासाठी हे कागद म्हणजे मोठा खजिनाच आहे. सूर्य देवतेचा प्रकोप करण्याची पद्धत अलिकडची असावी असं मानलं जात होतं. पण आता पुराव्यावरून ही अतिप्राचीन पद्धत असल्याचं मानलं जात आहे.
या 40 जळालेल्या तुकड्यांच्या पूर्वी अपोफिस रिच्युअलचं एक लिखित रेकॉर्ड होतं. ते रिचुअल मॅन्युअल चौथ्या शतकातील इसवी सनाच्या पूर्वेच्या अखेरचं होतं. इजिप्त पुजाऱ्यांनी सुरुवातीला हा मंत्र सूर्य देवते रा च्या मदतीसाठी तयार केला होता. याचा हेतू अराजकता, आग आणि अंधारात साप देवता अपोफिसशी युद्ध करण्याचा होता.
अपोफिसला सूर्य देवता रा चा कायमचा शत्रू मानलं जात होतं. नंतर रिच्युअलचा वापर फैरोच्या शत्रूंना शाप देण्यासाठी होऊ लागला. लोक बिघडलेलं हवामान आणि विषा सारख्या संकटाचा सामना करणअयासाठी याचा सहारा घेतला जात होता. थीब्स मंदिराच्या परिसरातील कचऱ्याचे ढिग हटवत असताना ठक ठकचा आवाज आला आणि त्यात हा अत्यंत दुर्मीळ खजिना सापडला.
इजिप्तशियन संस्कृतीचा भाग
त्याकाळी अपोफिस विधीवर केवळ धार्मिक नेत्यांचाच अधिकार होता, असे संशोधकांना आधी वाटत होते. मात्र थीब्समधील मंदिराच्या अवशेषांत सापडलेल्या पपायरसच्या तुकड्यांनी ही धारणा बदलली आहे. कोपनहेगन विद्यापीठातील इजिप्तोलॉजिस्ट आणि या अभ्यासाचे सह-लेखक फ्रेडरिक हेगन म्हणाले, “हे तुकडे दाखवतात की हा विधी इ.स.पू. चौथ्या शतकातील प्रतीपेक्षा खूपच जुना होता.” ते पुढे म्हणाले, “एक हजार वर्षांपूर्वी, म्हणजे न्यू किंगडमच्या काळातच, तो इजिप्शियन संस्कृतीचा भाग होता.”
कागद सापडणं हेच सुदैव
हेगन यांच्या मते, पुजारी नसलेले सुशिक्षित लोकही जादूगार आणि वैद्य (हीलर) म्हणून काम करत असत. सामान्य लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किंवा इतरांवर हल्ला करण्यासाठी लेखकांची मदत घेत असत. हे जळालेले तुकडे आजपर्यंत टिकून राहिले, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. हा शाप पूर्ण करण्याचे नियम अतिशय विचित्र होते. पपायरसवर मंत्र लिहिल्यानंतर तो थेट जाळला जात नसे. आधी लोक तो पपायरस पायाखाली तुडवत, मग त्यावर सुरीने वार करत आणि थुंकतही. शेवटी संपूर्ण साहित्य आगीत नष्ट केले जाई. हेगन म्हणाले, “विधी यशस्वी होण्यासाठी साहित्य आगीत जाळणे आवश्यक होते, त्यामुळे ते ओळखता येण्याजोग्या अवस्थेत सापडणे हे मोठे सुदैव आहे.”
