AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समितीची नियुक्ती कधी? बावनकुळेंकडून मोठी अपडेट

बच्चू कडू यांचं उपोषण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली होती, आता या संदर्भात मंत्री बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समितीची नियुक्ती कधी? बावनकुळेंकडून मोठी अपडेट
Image Credit source: TV9 Hindi
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 4:18 PM
Share

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. बच्चू कडू यांचं उपोष सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली होती.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात येईल, या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता सर्वाचं लक्ष या समितीची स्थापना कधी होणार याकडे लागलं आहे? यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात या समितीची घोषणा करू, मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे, आमची समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात ती घोषित करू, येत्या तीन जुलैला यासंदर्भात चार वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक होणार आहे. माझ्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आठ ते दहा मंत्री देखील सहभागी होणार आहेत. धन दांडग्याना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी, अशी आमची भूमिका असल्याचं देखील यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन 

दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून सातत्यानं सुरू आहे, त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होता, आंदोलनाच्या सहाव्या दिवशी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती, त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावाला होता.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलताना म्हटलं होतं की आम्ही लवकरच त्यासाठी एका समितीची स्थापना करू, या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ, त्यामुळे आता ही समिती कधी स्थापन होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, या संदर्भात आता बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; ठाकरेंचा मोठा दावा
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर...
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...