AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: तुरुंगात अर्ध्या दिवसातच पूर्ण होते का एका दिवसाची शिक्षा? काय आहे नियम समजून घ्या

Jail Sentence Rule: तुरूंगात एखाद्या आरोपीला जेरबंद केल्यानंतर त्याच्या शिक्षा मोजण्याचा कालावधी कसा असतो? याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. तुरूंगात दिवस आणि रात्र हे वेगवेगळे मोजले जातात, असं बोललं जातं. पण खरंच तसं असतं का? काय आहे नियम सोप्या भाषेत समजून घेऊयात.

GK: तुरुंगात अर्ध्या दिवसातच पूर्ण होते का एका दिवसाची शिक्षा? काय आहे नियम समजून घ्या
GK: तुरुंगात अर्ध्या दिवसातच पूर्ण होते का एका दिवसाची शिक्षा? काय आहे नियम समजून घ्याImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 01, 2026 | 3:53 PM
Share

एखादा गुन्हा केल्यानंतर न्यायालयात खटला चालतो आणि सिद्ध झाला तर आरोपीला तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाते. त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरूपावर तुरूंगवासाची शिक्षा कालावधी ठरतो. पण असं असताना तुरूंगवासाच्या शिक्षेबाबत बरेच संभ्रम सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. यात सर्वात मोठा संभ्रम हा तुरूंगातील दिवस मोजणीबाबतचा आहे. तुरूंगात दिवस आणि रात्र वेगळी मोजली जाते, याबाबत बोललं जातं. म्हणजेच अर्ध्या दिवसाची शिक्षा पूर्ण शिक्षा म्हणून गणली जाते, असं सहज बोलून जातात. तुरूंगात दिवसांची गणना वेगळ्या प्रकारे केली जाते. त्यात दिवस आणि रात्रीची गणना वेगळी होते. त्यामुळे आरोपीचा शिक्षेचा कालावधी लवकर पूर्ण होतो, वगैरे वगैरे… पण हा एक गैरसमज आहे. असं काही नसतं. या मागचं कायदेशीर बाजू समजून घेतल्यास तुमचाही गैरसमज दूर होईल.

काय तुरूंगावासच्या दिवसाचा नियम?

भारतीय कायद्यानुसार, आपला जसा दिवस मोजतो अगदी तसाच तुरूंगातील एक दिवस मोजला जातो. म्हणजेच 24 तासांचा एक दिवस गणला जातो. त्यामुळे तुरूंगात काही वेगळं सूत्र किंवा सूट असते असं अजिबात नाही. त्याबाबत कोणतीच कायदेशीर तरतूदही नाही. त्यामुळे तुरूंगातील दिवस आणि रात्र वेगळे मोजले जातात, यात काही तथ्य नाही. जर एखाद्या आरोपीला एका वर्षाची शिक्षा झाली तर त्याला संपूर्ण 365 दिवस तुरूंगातच काढवे लागतात. त्यात कोणतीच सूट नसते.

शिक्षा कशी कमी केली जाते?

तुरूंगात दिवस रात्र वेगळी मोजण्याचा असा काहीच नियम नाही. पण शिक्षेत कापत होते. या कपातीला लोकं अर्धा दिवस समजतात. या प्रकाराला सेट ऑफ आणि रिमिशन असं संबोधलं जातं. जर एखादी व्यक्ती खटला सुरू असण्याच्या कालावधीत आधीच तुरूंगात असेल तर मिळालेल्या शिक्षेतून ती वजा केली जाते. समजा, एका वर्षाची शिक्षा सुनावली गेली असेल आणि खटला सुरू असताना सदर आरोपी सहा महिने तुरूंगात राहिला असेल तर त्याला फक्त सहा महिन्यांचा तुरूंगावास भोगावा लागेल. कारण त्याने खटला सुरू असताना आधीच सहा महिन्यांचा तुरूंगवास भोगला आहे. या प्रकाराला सेट-ऑफ असं म्हणतात. रिमिशन प्रकारात चांगल्या वर्तनासाठी, तुरुंगातील कामासाठी किंवा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 432 आणि 433अ अंतर्गत विशेष परिस्थितीत शिक्षामाफी देऊ शकते.

पॅरोल आणि फर्लो ही काय सूट नाही

तुम्ही अनेकदा वाचालं किंवा ऐकलं असेल अमुकतमूक आरोपीला पॅरोल मिळाला, फर्लो मिळाला. त्यामुळे आरोपीच्या शिक्षेत कपात झाली असा एक गैरसमज असतो. पण ही फक्त तुरूंगातून बाहेर पडण्याची तात्पुरती परवानगी असते. त्यात शिक्षेत कपात वगैरे असं काही नसतं. पॅरोल हा 30 दिवसांसाठी असतो आणि ठरलेल्या अवधीनंतर आरोपीला परत तुरूंगात यावं लागतं. फर्लो म्हणजे शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला ठराविक काळासाठी तुरुंगातून दिली जाणारी रजा. हा कैद्याचा एक कायदेशीर अधिकार मानला जातो, जो त्याला कुटुंबाशी आणि समाजाशी संबंध टिकवून ठेवण्यासाठी दिला जातो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी