Explainer : आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियान थेट मातोश्रीपर्यंत, कलानगरात काय घडलं? वाचा A टू Z
आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस का देण्यात आली, असाही प्रश्न विचारला जात आहे. या नोटिशीचा संबंध आदित्य ठाकरे यांचे एक ट्वीट आहे. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा दाखला दिला, तसंच आदित्य ठाकरेंच्या माणसांनी आमच्या वकिलांना धमकी दिली असा आरोपही त्यांनी केला.

दिनेश दुखंडे, निवृत्ती बाबर, कृष्णा सोनारवाडकर TV9 मराठी, मुंबई : सध्या राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने चालू केला आहे. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी माझ्या मुलीची हत्या झाली आहे, माझ्या मुलीवर बलात्कार झाला, असा जबाब नोंदवला. सोबतच, माजी मंत्री आदित्य, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तसेच अन्य बड्या व्यक्तींचे नाव सतीश सालियान यांनी घेतलेले आहे. सतीश सालियान यांच्या जबाबानंतर सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात मात्र सीबीआयने कोणाचेही नाव घेतलेले नसून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मी दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही, मी त्यांना ओळखत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यांच्या याच स्पष्टीकरणानंतर नवा वाद रंगला आहे. सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस दिली आहे. ही नोटीस देण्यासाठी खुद्द सतीश सालियान मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. परंतु त्यांना रोखण्यात आले. सतीश सालियान नोटीस देण्यासाठी आल्यानंतर काय घडले?...
