AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: 25000 रुपयांची पेन्शन 87500 रुपये होणार? पेन्शनधारकांसाठी एक मोठा लाभ मिळण्याची चर्चा

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाची स्थापना होऊन एक वर्ष उलटले आहे, तरीही अजूनही अनेक गोष्टींबाबतीत स्पष्टता आलेली नाही. आतापर्यंत काय काय घडले याबद्दल जाणून घ्या.

8th Pay Commission: 25000 रुपयांची पेन्शन 87500 रुपये होणार? पेन्शनधारकांसाठी एक मोठा लाभ मिळण्याची चर्चा
8th pay commission
| Updated on: Nov 04, 2026 | 5:55 PM
Share

आठव्या वेतन आयोगाची स्थापना होऊन आता काल एक वर्ष पूर्ण झाले. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थापन झालेल्या या आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. १८ महिन्यांचा कालावधी म्हणजे मे २०२७ च्या सुमारास अहवाल अपेक्षित आहे. वेतन आयोगाने विविध राज्यांतील कर्मचारी संघटनांसोबत बैठका घेतल्या आहेत. या बैठका घेतल्या असल्या तरी, वेतन आणि पेन्शनमध्ये नेमके काय बदल केले जाणार आहेत, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

पेन्शनधारकांसाठी एक मोठा लाभ मिळण्याची चर्चा!

विविध अहवालांमध्ये काही महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. जे पेन्शनधारकांसाठी मोठ्या फायद्याचे ठरू शकतात. वेतन वाढीच्या चर्चेसोबतच, पेन्शनधारकांसाठी एक मोठा लाभ मिळण्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. आठव्या आयोगाच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर, पेन्शनची रक्कम २५,००० रुपयांवरून थेट ८७,५०० रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

अहवालानंतरच अंतिम निर्णय!

८ व्या वेतन आयोगाची कर्मचारी संघटनांसोबतची बैठकांची मालिका सध्या सुरू आहे. आयोगासमोर मांडण्यात आलेल्या मागण्यांवर अद्याप विचारविनिमय सुरू आहे. हे पथक गेल्या ऑक्टोबरमध्ये मुंबईला आले होते. १० ऑगस्ट रोजी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, ‘आयोगाने अद्याप आपल्या शिफारसी सादर केलेल्या नाहीत. त्यांनी सांगितले की, अंमलबजावणीची तारीख किंवा ‘फिटमेंट फॅक्टर’ यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, कारण अशा बाबींवर सरकारचा निर्णय अहवाल सादर झाल्यानंतरच घेतला जातो.’

पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता

थोडक्यात सांगायचे तर, कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त व्यक्तींची पेन्शन आणि इतर संबंधित बाबी आयोगाचा अहवाल आणि त्यानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या आधारे निश्चित केल्या जातील. तथापि, विविध तज्ज्ञ आणि अहवालांनी, कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा आधार घेत, वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत, ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिकृत सरकारी घोषणा होण्यापूर्वी इतर स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी, केवळ वित्त मंत्रालय आणि ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (PIB) द्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीवरच अवलंबून राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निर्णय शेवटी सरकारलाच घ्यायचा आहे

८ व्या वेतन आयोगाची समिती आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चेदरम्यान मांडल्या गेलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ६९,००० रुपयांचे किमान मूळ वेतन आणि ३.८३३ फिटमेंट फॅक्टर लागू करणे यांचा समावेश आहे. यावरून कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा स्पष्ट होतात; मात्र, या मागण्या मान्य करायच्या की नाही, याचा निर्णय शेवटी सरकारलाच घ्यायचा आहे.

मात्र, वेतन आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर, सरकार त्यातील शिफारसींचा विचार करेल आणि त्यानंतर त्यात काही सुधारणा असल्यास त्यांची घोषणा करेल.याचाच अर्थ असा की, वेतन किंवा पेन्शनमध्ये किती वाढ द्यायची, याचा निर्णय पूर्णपणे सरकारवरच अवलंबून असेल.

Follow Us
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?