AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा

| Updated on: Aug 01, 2026 | 2:18 PM
Share

पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अमित शाह यांनी अजित डोभाल यांच्या देशसेवेचे कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळाची माहिती देताना त्यांनी देशाच्या सेवेसाठी मोठे समर्पण केल्याचे सांगितले.

यावेळी अमित शाह यांनी तरुणांना टिळकांनाच्या नजरेने, त्यांच्या विचारधारेने गीता वाचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मला टिळकांनी लिहीलेली गीता गुजरातीत मिळाली. मी ती वाचली आहे त्यामुळे माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो.” हा ग्रंथ भगवद्गीतेचा व्यावहारिक स्वरूप असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमित शाह यांनी टिळकांच्या पत्रकारितेतील योगदानाचाही उल्लेख केला. “इंग्रज हे कोणत्या पेपरला घाबरायचे तर ते केसरी आणि मराठाला घाबरायचे,” असे ते म्हणाले. राष्ट्राची चेतना जागवून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे टिळक मानत होते. विविध उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संघटित करण्याचे काम केले.

Published on: Aug 01, 2026 02:07 PM

Follow Us