AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Mayor: अमरावतीत भाजपच धुरंधर; AIMIM च्या पाठिंब्याने फुलले ‘कमळ’, ताज्या घाडमोडीत या नगरसेवकाचा राजकीय बळी?

BJP-AIMIM in Amravati Mayor: अमरावती महापालिकेत मित्र पक्ष आणि विरोधकांवर भाजप भारी ठरला. भाजपने एकाच फटक्यात सर्वांचे हिशेब चुकते केल्याचं मानलं जातं. AIMIM च्या पाठिंब्याने इथं 'कमळ' फुलले. पण त्याचा फटका पाठिंबा देणार्‍या उमेदवाराला बसला आहे. आता त्याच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे.

Amravati Mayor: अमरावतीत भाजपच धुरंधर; AIMIM च्या पाठिंब्याने फुलले 'कमळ', ताज्या घाडमोडीत या नगरसेवकाचा राजकीय बळी?
अमरावती महापौर Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 9:20 AM
Share

BJP-AIMIM in Amravati Mayor: अमरावतीत भारतीय जनता पार्टीने मित्र पक्ष आणि विरोधकांचे हिशोब एकदाच चुकते केल्याचं मानलं जात आहे. भाजप इथं धुरंधर ठरली आहे. भाजपने कट्टर विरोधक एमआयएमच्या पाठिंब्याने महापौर पद खिशात घातलं. एआयएमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना मतदान केले. या एका मताने भाजपचं पारड जड भरलं. श्रीचंद तेजवानी अमरावतीचे महापौर झाले. या खेळीने अनेकांचे भाजपचं गणित बिघडवण्याचं स्वप्न भंग पावलं. अमरावतीच्या महापालिकेतील राजकीय घडामोड काय?

महापौर पदाचा काय फॉर्म्युला?

अमरावतीमधील महायुतीत भाजप, शिंदे सेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा समावेश आहे. भाजपच्या महापौरपदासाठी राजकीय तडजोडी आणि समीकरणं जुळवण्यात आली. श्रीचंद तेजवानी यांना 1.5 वर्षासाठी तर भाजपचे आशिष अतकरे यांना 1.5 वर्षासाठी महापौर पद मिळणार आहे. तर युवा स्वाभिमानी पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौर झाले आहेत.

या निवडणुकीत भाजपतंर्गत आणि भाजप विरुद्ध इतर पक्ष असा कलह अनेकदा समोर आला. तरीही भाजपने महापौर पद हातचं जाऊ दिलं नाही. 22 भाजप उमेदवारांनी, ज्यातील 20 जण या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी पत्र लिहिले होते. तर युवा स्वाभिमानी पक्षाने काही जागांवर भाजप उमेदवारांना पराभूत केले. त्यामुळे वाद वाढला होता.

एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची हकालपट्टी

अमरावतीत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाविरोधात जाऊन भाजपला समर्थन देणे एमआयएमच्या नगरसेविलेला भोवले. मीरा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.

एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी भाजपच्या महापौर उमेदवाराला मतदान केले. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले. मीरा कांबळे यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एमआयएमकडून सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. तरीही कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदान केल्याचा आरोप आहे. पक्षादेश मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा गटनेत्यांनी दिला आहे.  या सर्व घडामोडीत कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकतं का, त्यांचा राजकीय बळी जाणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश