AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपा आणि एमआयएमची थेट युती, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ, सत्तेत..

BJP and MIM alliance : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसहिंता लागली आहे. यादरम्यानच आता थेट एमआयएम आणि भाजपाने युती केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भाजपा आणि एमआयएमची थेट युती, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ, सत्तेत..
BJP and MIM
| Edited By: | Updated on: Jan 22, 2026 | 11:13 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून आता महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आणि महापालिका निवडणुका लढल्या. मनसेला घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचा नक्कीच फायदा झाला. मात्र, मनसेला फार जास्त फायदा न झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीतरी वेगळे घडण्याचा अंदाज होता. मात्र, तरीही महापालिका निवडणुकीत भाजपानेच बाजी मारली. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत गेल्यानंतर दावा केला होता की, मुंबई महापालिकेचा महापाैर आमचाच होईल. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला असून महापाैर हा युतीचा होणार आहे. मुंबई महापालिकेसोबतच इतर काही महापालिकांच्या निवडणुका भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून लढवल्या. दोन्ही पक्षांची कामगिरी चांगली राहिली.

महापालिका निवडणुकीमध्ये अजून एका पक्षाने मोठी मुसंडी मारली. एमआयआमने अनेक महापालिकांमध्ये धमाकेदार कामगिरी केली आणि राज्यातील महापालिकांवर आपल्या पक्षाचा बोलबाल केला. मात्र, विरोधकांकडून आरोप करण्यात आला की, एमआयएमला भाजपानेच पाठिंबा दिला आणि त्यांनी मोठे केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने खास कामगिरी केली. मुंबई महापालिकेत मोठे यश एमआयएमला मिळाले.

आता थेट अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमने युती केली. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. एमआयएम आणि भाजपाने युती केली आहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली. या युतीमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडी समितीचे सभापती पद देखील मिळाले. मात्र, या युतीची आता राज्यभर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

एमआयएमच्या 3 , अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत गेला. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण फुटले. एमआयएम आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कधीही एमआयएम आणि भाजपा एकत्र येईल, असा साधा कोणी विचारलही केला नाही. मात्र, अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे प्रत्यक्षात ठरले आहे.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....