AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर आता टी 20I मालिकेचा थरार, टीम सज्ज, पहिला सामना कधी?

T20i Series 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीालंडला पराभूत केलं होतं. आता उपविजेता न्यूझीलंड मायदेशात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे.

Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर आता टी 20I मालिकेचा थरार, टीम सज्ज, पहिला सामना कधी?
Suryakumar Yadav and Devon Concway CricketImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 14, 2026 | 2:10 AM
Share

न्यूझीलंड क्रिकेट टीम जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. न्यूझीलंडने भारताचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव केला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला टी 20i सीरिजमध्ये 4-1 ने पराभूत केलं. या द्विपक्षीय मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले. मात्र भारताने न्यूझीलंडचा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यंदाही अधुर राहिलं. टीम इंडिया विश्वविजेता ठरली. तर न्यूझीलंडला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागंल आहे.

न्यूझीलंड मायदेशीत परतताच आता 15 मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. हा सामना रविवारी 15 मार्चला होणार आहे. या निमित्ताने दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड टी 20i वर्ल्ड कप 2026 सेमी फायनलनंतर आमनेसामने येणार आहेत. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा या मालिकेत न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंड दौरा 2026

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 मार्चपासून टी 20i मालिकेला सुरुवात होईल. तर 25 मार्चला पाचव्या आणि अंतिम सामन्याने या मालिकेची सांगता होईल. एडन मारक्रम या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर न्यूझीलंड टीम मॅनेजमेंटने या मालिकेसाठी 2 कर्णधारांची नियुक्ती केली आहे. न्यूझीलंडचं पहिल्या 3 सामन्यांमध्ये नियमित कर्णधार मिचेल सँटनर नेतृत्व करणार आहे. तर शेवटच्या 2 सामन्यांमध्ये टॉम लॅथम याच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 15 मार्च.

दुसरा सामना,  17 मार्च.

तिसरा सामना,  20 मार्च.

चौथा सामना, 22 मार्च.

पाचवा सामना, 25 मार्च.

न्यूझीलंडने 8 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना खेळला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही मालिका होत आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने वर्कलोडचा विचार करता काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे यजमान न्यूझीलंड क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी 20i मालिकेत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल