‘असदुद्दीन ओवैसी चेकाळलाय’, हिजाबच्या स्टेटमेंटनंतर भाजप खासदाराचं वक्तव्य
"लक्षात ठेवा मुस्लिमांबद्दल तुम्ही हा जो द्वेष पसरवताय, तो जास्त काळ टिकणार नाही. द्वेष पसरवणारे संपून जातील. आज तुम्ही बघा, सोलापूरमध्ये 104 रुपयात एक लिटर पेट्रोल मिळतं"

“भारताच्या संविधानात सर्व समाजाच्या लोकांचं एकच स्थान आहे. आपण तेव्हा नसू, पण एकदिवस असा येईल, जेव्हा हिजाब घालणारी मुलगी भारताची पीएम बनेल” असं असदुद्दीन ओवैसी सोलापूरच्या सभेत बोलले. त्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. ‘असदुद्दीन ओवैसी चेकाळलाय’ असं ते म्हणाले. “इराणमध्ये महिला एकत्र येऊन हिजाब उतरवतात. मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय,कोणालाही पारतंत्र्य नकोय. पण ओवैसी अर्धसत्य बोलले, भारतामध्ये लोकसंख्येचे प्रमाण असंतुलित होत आहे. म्हणून हिंदूंनी एकजूट व्हावं, तरच हिंदू या देशावर राज्य करू शकतील” असं अनिल बोंडे म्हणाले.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप नंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून ही हिंदुत्वाचे कार्ड. अमरावतीच्या प्रगतीचा भगवा पर्व. लाडक्या बहिणीचा मान आपला धनुष्यबाण अशा आशयाचे शहरात मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. भाजप नंतर अमरावतीत शिवसेनेचे मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. शिवसेनेचे अनेक नेते प्रचारासाठी अमरावतीमध्ये येणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती.
ओवेसी नेमकं काय म्हणालेले?
“एकाच समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती बनेल असं पाकिस्तानच्या संविधानात लिहिलं आहे. पण भारताच्या संविधानात सर्व समाजाच्या लोकांचं एकच स्थान आहे. आपण तेव्हा नसू, पण एकदिवस असा येईल, जेव्हा हिजाब घालणारी मुलगी भारताची पीएम बनेल” असं असदुद्दीन ओवैसी जाहीर सभेत बोलले. “लक्षात ठेवा मुस्लिमांबद्दल तुम्ही हा जो द्वेष पसरवताय, तो जास्त काळ टिकणार नाही. द्वेष पसरवणारे संपून जातील. आज तुम्ही बघा, सोलापूरमध्ये 104 रुपयात एक लिटर पेट्रोल मिळतं. पेट्रोलचे कोणी रेट विचारले, तर त्याला बांग्लादेशी ठरवलं जातं” अशा शब्दात विरोधकांवर ओवैसींनी हल्लाबोल केला.
