AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackrey : देवेंद्र फडणवीसांना मिरचीची धुरी का लागली ? उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. शिंदे यांचा गट ही 'एसंशि गट' असून, शहांची 'तोडा, फोडा आणि राज्य करा' ही नीती असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस सत्तेचा गैरवापर करत बिनविरोध निवडणुका घेत असून, त्यांना आपल्या टीकेने 'मिरचीची धुरी' लागल्याचा चिमटाही ठाकरेंनी काढला.

Uddhav Thackrey : देवेंद्र फडणवीसांना मिरचीची धुरी का लागली ? उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
| Updated on: Jan 10, 2026 | 1:00 PM
Share

शिंदेंची शिवसेना नाहीच, तो एसंशि गट (एकनाथ शिंदे गट) आहे. ती शहांची कपटनिती आहे, तोडा, फोडा आणि राज्य करा ही त्यांची निती. त्याला मी काही यश मानत नाही. आतासुद्धा जे चाललं आहे. धाक दपटशाह, जोरजबरदस्ती. जे बिनविरोध लोक निवडून येत आहे. बिनविरोध निवडणुका होत आहेत, आत्तापर्यंत असे लोक निवडून येत नव्हते. पण आम्ही त्याच्यावरती टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मिरचीची धुरी का लागली ? असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमित शाह, भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रचार निर्णायक टप्प्यात आला असून राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारील मतदान तर 16 तारखेला मतमोजणी होईल. मात्र या निवडणुकीच्या आधीच अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तो मुद्दा गाजतोय.  महायुतीचे 60 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजप आणि एकनाथ शिंदे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवरून निशाणा साधला.

आमचा एकही माणूस बिनविरोध कसा नाही ?

फडणवीस हे सत्तेचा दुरूपयोग करत आहेत, त्यांचे जे आरओ असतील, त्यांना कोणत्या मंत्र्यांचे फोन गेले, काय बोलणं झालं ते चेक करा. बिनविरोध निवडणूक करायची असेल तर मग आमच्यापैकी एकही माणूस बिनविरोध निवडून कसा आला नाही ? असा बिनतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसं बघितलं तर मग सगळ्याच पक्षांचे लोक बिनविरोध निवडून यायला पाहिजेत ना . बिनविरोध करायाल राहुल नार्वेकर स्वत: तिथे जातात. त्यामुळे आता अक्षरश: मिरचीचा मसाला देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात गेलाय असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. आम्ही मिरची लावल्यावर काय होईल ते पाहा. आम्ही मिरच्या लावल्या तर यांना कुठे कुठे झाकावं लागेल ते पाह असंही ते म्हणाले.

 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...