AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?

Onion Shortage in State: राज्यात कांदा टंचाई होणार असल्याचा दावा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने हवा काढली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांनी सरकारला मोठा इशाराही दिला आहे.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?
कांद्याचा भाव
| Updated on: Jul 22, 2026 | 9:06 AM
Share

Onion Rate Hike: राज्यात पुढील दोन महिन्यांत कांदा टंचाई होईल असा दावा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला होता. त्यावरून आता वातावरण तापले आहे. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पाशा पटेल यांच्या अंदाजाची पोलखोल केली आहे. त्यांनी या दाव्याची हवाच काढली आहे. यंदाही कांदा रडवणार का? असा घोर सर्वसामान्यांना लागलेला असतानाच संघटनेने मोठा दिलासा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. सरकारच्या धोरणावर गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. निर्यात धोरणावर सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी गेल्यावेळी केला होता. यावेळी सरकारने हस्तक्षेप केल्यास विरोधाला सामना करावा लागेल असा खणखणीत इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पाशा पटेल यांचा दावा पूर्णपणे चुकीचा

राज्यात पुढील दोन महिन्यांत कांद्याची टंचाई निर्माण होणार, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. शेतकर्‍यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे. नवीन कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सांगितले आहे. त्यांनी कांदा टंचाईचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

कांद्याचे दर पाडल्यास तीव्र आंदोलन

सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे दर पाडल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. कांद्याच्या बाजारभावात हस्तक्षेप करू नये अशी भूमिका शेतकरी संघटनांनी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी प्रमाणे निर्यात धोरण न राबवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. सरकारच्या धोरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता तसा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

पाशा पटेल यांच्या दाव्याची काढली हवा

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पुढील दोन महिन्यांत कांदा टंचाईचा अंदाज व्यक्त केला होता. पाशा पटेल यांच्या निरीक्षणाला शेतकरी प्रतिनिधींकडून विरोध करण्यात आला आहे. शेतकर्‍यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे. नवीन कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे कांदा टंचाई होण्याची शक्यता नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली आहे. एकीकडे सरकारचे प्रतिनिधी राज्यात कांदा टंचाईची शक्यता वर्तवत आहेत. तर शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा करत आहेत. येत्या काही दिवसात या मुद्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता समोर येत आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी