AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा मोठा निर्णय, सीजेपीच्या नेत्याची आता थेट UP च्या निवडणुकीत एन्ट्री?

Cockroch Janta Party: कॉकरोच जनता पार्टीची उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एन्ट्री होणार आहे अशी चर्चा रंगली आहे. कारण सीजेपीच्या नेत्याने सपासोबत एक मीटिंग केली आहे आणि मीटिंगमागील कारण आणखी समोर आलेली नाही.

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा मोठा निर्णय, सीजेपीच्या नेत्याची आता थेट UP च्या निवडणुकीत एन्ट्री?
| Updated on: Sep 04, 2026 | 7:37 AM
Share

‘कॉकरोच’ जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी गुरुवारी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावरुन अभिजीत दिपके युपीच्या निवडणुकीत एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण समाजवादी पक्ष बेरोजगारी, शिक्षण आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपप्रणीत राज्य सरकारला लक्ष्य करत आहे.

सपाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी पीटीआयला या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, चर्चेच्या विषयांविषयी तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. चौधरी म्हणाले की, “तरुण, बेरोजगारी आणि शालेय शिक्षणाची स्थिती यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.” शाळा बंद असल्याबद्दल यादव यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे आणि राज्यातील प्राथमिक शाळा बंद ठेवण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार तसेच उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रांका आणि यादव यांनी सपा मुख्यालयाजवळील जनेश्वर मिश्रा ट्रस्टच्या कार्यालयात सायंकाळी ४ वाजल्यापासून दीड तास बंद दाराआड बैठक घेतली.

बैठकीनंतर, रांका माध्यमांशी न बोलता निघून गेला, तर समाजवादी पक्षानेही चर्चेचा उद्देश किंवा निकालाबाबत कोणतेही निवेदन जारी केले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, यादव आणि रांका यांच्यातील चर्चेत विद्यार्थी-संबंधित मुद्दे, तसेच ‘जनरेशन Z’ आणि ‘जनरेशन अल्फा’ यांच्या चिंतांचा समावेश असण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत सीजेपीने देशभरात विद्यार्थी प्रश्नांवर केलेल्या कार्यादरम्यान ही चर्चा झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये ‘स्कूल फिक्स करो’ मोहिमेदरम्यान रांका यांच्यावर कथित हल्ला झाल्यानंतर यादव यांनी हा मुद्दा सार्वजनिकरित्या उपस्थित केला.

सीजेपीने दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस लाठीचार्जनंतर, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव आणि आझमगडचे खासदार धर्मेंद्र यादव यांच्यासह पक्षाचे नेते आंदोलक विद्यार्थ्यांशी एकजूट दाखवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अखिलेश यादव यांनीही अनेक प्रसंगी सीजेपीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

विशेष म्हणजे, सीजेपीने अलीकडेच ५ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीतील इंडिया गेटपासून मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, परंतु नंतर तो मागे घेण्यात आला. सरकारने जुलैमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप पक्षाने केला होता. एफआयआर मागे घेतल्यानंतर आणि नुकसान भरपाईची घोषणा झाल्यानंतर, सीजेपीने या निर्णयांचे स्वागत केले आणि मोर्चा मागे घेतला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी