AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर भाजप किसान मोर्चा आक्रमक; कर्जमाफीच्या यादीवरून बँक व्यवस्थापनाला जाब, रोहित पवारांचाही जिल्हाधिकाऱ्यांना फोन

Nanded Farmer News: शंकर क्षीरसागर यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी रोहित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यां फोन केला होता. वडिलांसह कर्जमाफीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर भाजप किसान मोर्चा आक्रमक; कर्जमाफीच्या यादीवरून बँक व्यवस्थापनाला जाब, रोहित पवारांचाही जिल्हाधिकाऱ्यांना फोन
| Updated on: Oct 22, 2026 | 12:11 AM
Share

नांदेड जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बोरगाव येथे शेतकरी शंकर शिरसागर यांनी एक भावनिक व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून करीत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर त्यांनी आपली जीवन यात्रा संपविली होती. तीन वेळच्या कर्जमाफीत आपलं नाव न आल्याने आणि नदीवरील वीज कनेक्शन तोडल्याने शेतातील पीक वाळल्याने हताश होऊन त्यांनी जीवन संपविले होते. शंकर क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसच्या प्रदेश सहप्रभारी रेहाना चिस्ती आणि खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी नेत्यांनी पीडित कुटुंबाशी चर्चा करून त्यांची व्यथा जाणून घेतल्या.

या भीषण परिस्थितीची माहिती राहुल गांधी यांना दिल्या नंतर त्यांनी दुःख व्यक्त केल्याचे रेहाना चिस्ती यांनी सांगितले. सरकारचे शेतकरी धोरण आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याऐवजी पिकांसाठी पाणी, वीज पुरवठा आणि ठोस आर्थिक दिलासा देण्याची त्यांनी तातडीची मागणी केली. यानंतर कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची यादी गावा गावात न लावल्याने भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.

कर्जमाफीसाठीची पात्र शेतकऱ्यांची यादी गावात न लावल्याने बोरगावच्या शंकर क्षीरसागर यांनी जीवन संपविल्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. जिल्हा उपनिबंधक आणि बँकाच्या ढिसाळ कारभारामुळ शेतकऱ्याने जीवन संपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केला. रंगनाथ सोळंके आणि भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते झाले होते. नांदेडच्या वजीराबाद येथील ग्रामीण बँकेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

दत्तक गावात यादी लावण्यावरून बँकेच्या व्यवस्थापकाला तासभर धारेवर धरले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापकाला धारेवर धरल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बँकेत उपस्थिती लावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बँक व्यवस्थापनाकडून माहिती आहे. माझे कर्जमाफीत नाव न आल्याने आपण जीवनयात्रा संपवित आहोत, असा व्हिडिओ करून जीवन संपवणाऱ्या शेतकरी शंकर क्षीरसागर यांच कर्जमाफीसाठी बँकेने पाठवलेल्या यादीत नाव असल्याचा भाजपा पदाधिकाऱ्यानी Tv9 मराठीला माहिती दिली आहे.

वजीराबाद येथील ग्रामीण बँकेत भाजपा पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. बँक व्यवस्थापकाने दिलेल्या आश्वासनानंतर भाजप पदाधिकारी शांत झाले. तसेच यानंतर आमदार रोहित पवार आज बोरगाव येथील जीवन संपवल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. बोरगाव तेलंग येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर क्षीरसागर यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट घेतली. शंकर क्षीरसागर यांची भक्ती आणि शिवानी या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

माझ्या मुलींना शैक्षणिक फी माफ झाली म्हणत जीवन संपवण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ केला होता. मी जीवन संपवल्याची गंभीर दखल घेण्याचे ही शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलं होते. भावनिक व्हिडिओनंतर रोहित पवारांकडून कुटुंबियांची भेट घेण्यात आली आहे. त्यावेळी रोहित पवारांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना फोन लावला. मयत शेतकरी शंकर क्षीरसागर आणि त्यांचे वडील आबानराव क्षीरसागर या दोघांचे कर्ज माफ करण्यासंदर्भाने जिल्हाधिकाऱ्यांना रोहित पवारांचा फोन लावला होता.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?