AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: तो काय फ्लॉप…झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान, Video Viral

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिका सुरु होणार असून या मालिकेपूर्वी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने वैभव सूर्यवंशीबद्दल एक विधान केले आहे.

Vaibhav Sooryavanshi: तो काय फ्लॉप...झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान, Video Viral
| Updated on: Jul 22, 2026 | 9:04 AM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना उद्या रंगणार आहे. आता या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय संघाकडून उपकर्णधार तिलक वर्माने हजेरी लावली होती तर झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने हजेरी लावली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीकडे लक्ष असणार आहे. कारण इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशीचे भारतासाठीचे पदार्पण अपेक्षेप्रमाणे झाले नसेल, पण झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याला विश्वास आहे की, जर या 15 वर्षीय खेळाडूला योग्य प्रकारे सांभाळले. या उदयोन्मुख फलंदाजाने इंग्लंडमधील तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा केल्या. भारताने ही मालिका 0-4 ने गमावली. यापैकी दोन डावांमध्ये सूर्यवंशी जोफ्रा आर्चरच्या एका शॉर्ट बॉलवर बाद झाला.

रझा म्हणाला, “वैभव एक खूप प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. त्याला फ्लॉप म्हणणं चुकीचं आहे. जर 15 वर्षांचा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असेल, तर केवळ दोन-तीन सामन्यांनंतर त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. मला वाटते की वैभवच्या आसपास अनेक खूप चांगले वरिष्ठ क्रिकेटपटू आहेत. जर त्याला योग्य प्रकारे सांभाळले गेले, तर मला वाटते की वैभव Once in generation टॅलेंट बनू शकतो.”  सूर्यवंशी हरारेला परतणार आहे, जिथे त्याने जानेवारीमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूंमध्ये सामना जिंकून देणारी 175 धावांची खेळी केली होती. संजू सॅमसन संघात नसल्यामुळे, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत सूर्यवंशीला डावाच्या सुरुवातीला अधिक संधी मिळतील.

रझा म्हणाला, “वैभवने गेल्या वर्षी जे केले, भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी जे केले आणि त्याच वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, ही कोणत्याही परिस्थितीत छोटी कामगिरी नाही. आजकाल अशा गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. वैभव खास आहे. त्याला कसे हाताळले जाते हे महत्त्वाचे असेल. या मालिकेत दोन्ही देशांना समान संधी मिळेल. आम्हाला आमच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि म्हणूनच, मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की ही मालिका खूप रोमांचक असेल.”

आता या मालिकेतील पहिला सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे 4.00 वाजता होईल आणि 4:30 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेत भारतीय संघावर विशेष लक्ष असणार आहे. कारण आता पुन्हा एकदा मालिका गमावली तर भारतीय संघावर बॅक टू बॅक नामुष्की ओढवेल.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?