AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

CJP Protest : मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुबोध भावे, अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
पूर्वा कौशिक, सुबोध भावे, रसिका सुनीलImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2026 | 10:21 AM
Share

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये विद्यार्थी-तरुण आंदोलकांना पोलीस आणि निमलष्करी दलांच्या जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. नीटच्या परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिनाभर करूनही केंद्र सरकारने दखल घेतली नव्हती. आता या संपूर्ण आंदोलनावर आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध मराठी कलाकारसुद्धा सोशल मीडियावर मोकळेपणे व्यक्त होत आहेत. अभिनेता सुबोध भावे, अतुल कुलकर्णी, पूर्वा कौशिक, रसिका सुनिल यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

सुबोध भावेची पोस्ट-

‘संवाद- तो नसतो तेव्हा विसंवाद सुरू होतो. आंदोलन करणारे तरुणही याच देशाचे आहेत आणि काठ्या चालवणारेही. निर्णय घेणारेही याच देशाचे आहेत आणि भरडले जाणारेही. हा प्रश्न या देशातील स्वप्न बघणाऱ्या लाखो तरुणांच्या किंबहुना आपल्याच देशाच्या भविष्याच आहे. ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार आहेत, त्यांनी संवेदनशील होऊन निर्णय घ्यावा हीच विनंती आणि इच्छा. भारतीय एकमेकांशी झुंजताना पाहणं ही काही फार सुखावह गोष्ट नक्कीच नाही. शरीरावर झालेल्या जखमा भरून येतील, पण मनावर झालेल्या जखमा खोल जाण्याआधी संवाद घडो हीच प्रार्थना’, अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावेनं लिहिली आहे.

पूर्वा कौशिकला कोसळलं रडू

झी मराठी वाहिनीवरील मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूर्वा कौशिकनेही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती म्हणाली, ‘मला खरंच वाटलं नव्हतं की मी असा व्हिडीओ शूट करेन. पण काही गोष्टी सहन होत नाहीयेत. खूप हलबल झाल्यासारखं वाटतंय. आपण कुणीच काहीच करू शकत नाही, याचं वाईट वाटतंय. माणसं मरतायत, लोकशाही असलेल्या देशात हे सगळं सुरू आहे. आपण सध्या काय करतोय, दोन वेळचं खातोय, झोपतोय. पण आपल्यासाठीच जे लोक लढत आहेत, त्यांचं काय होतंय? त्यांना आपण कोणत्या पद्धतीने मदत करू शकतो हे पहावं लागेल. हे जे काही सुरू आहे, ते लवकरात लवकर थांबावं, कारण माणसाची किंमत इतकी कमी आहे, हे मला माहीत नव्हतं.’ या व्हिडीओमध्ये पूर्वा रडतानाही दिसतेय.

अतुल कुलकर्णींची कविता-

रसिका सुनीलकडून संताप व्यक्त

अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय, ‘हे सगळं पाहून मन अक्षरश: तुटतंय. असहाय्य वाटतंय आणि रागही येतोय. हे अजिबात योग्य नाही. लाज वाटली पाहिजे. एखाद्याला इतकंसं समजावून सांगण्यासाठी कोणीतरी पटकथा लिहून द्यावी लागेल का? संवाद हा पर्याय असू शकतो.’

Follow Us
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?