Sindhudurg | सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना अखेर इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील 25 गावांना इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात खाणकाम तसेच मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कायमस्वरूपी निर्बंध लागू होणार आहेत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील 25 गावांना इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात खाणकाम तसेच मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कायमस्वरूपी निर्बंध लागू होणार आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे कोणतेही प्रकल्प या क्षेत्रात राबवता येणार नाहीत. मात्र, पर्यावरणपूरक आणि नियमांचे पालन करणारे उद्योग मर्यादित स्वरूपात उभारण्यास परवानगी असेल. या निर्णयामुळे वन्यजीव आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणी स्थानिक नागरिक आणि संबंधित घटक कितपत काटेकोरपणे पाळतात, याकडेही लक्ष लागले आहे.
Published on: Feb 28, 2026 05:29 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

