Sanjay Raut Press | केजरीवाल- सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्ला, म्हणाले, मोदी आणि शहा यांनी…
दिल्लीच्या मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 23 आरोपींसह राउस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. दोन्ही नेत्यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात सीबीआयने आरोप दाखल करून केजरीवाल आणि इतरांना अटक केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालिन नायब राज्यपाल यांच्याकडून या प्रकरणावर मोठा दबाव होता. केजरीवाल नेहमीच सांगत होते की मद्य धोरणात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की ह्या केसमध्ये पुरावे नसतानाही अटक करण्यात आली. त्यांनी या सीबीआय अधिकाऱ्यांवर कारवाई, निलंबन आणि खटले चालवण्याची मागणी केली. राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केजरीवाल यांची माफी मागावी, अशीही मागणी केली.
Published on: Feb 28, 2026 01:03 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...